Pimpri Crime News: सुनेच्या छळप्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी महापौरांसह पाच जणांविरोधात पुण्यात गुन्हा

ही बातमी शेअर करा.

Pimpri Crime News: सुनेच्या छळप्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी महापौरांसह पाच जणांविरोधात पुण्यात गुन्हा


Pckhabar-सुनेचा कौटुंबिक छळ, मारहाण, दमदाठी केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या माजी महापौर, विद्यमान नगरसेविका मंगला कदम यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनेच्या तक्रारीनुसार पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत सुनेने अनेक गंभीर आरोप केले आहेत.

याबाबत तन्वी कुशाग्र कदम (रा. गणेश सोसायटी, शिवाजीनगर पुणे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचे पती कुशाग्र कदम, सासू मंगला कदम, सासरे अशोक कदम, दीर गौरव कदम, जाऊ स्वाती कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तन्वी कदम यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पती कुशाग्र यांना दारु पिण्याचे व्यसन होते. ते पार्टीला जात. घरी रात्री उशिरा येत असत. त्याबाबत विचारणा केली असता मला शिवीगाळ करुन दमदाठी करत होते. सर्वंजण मिळून त्रास देत होते. पतीचे अनेक महिलांसोबत संबंध होते. याबाबत विचारणा केली असता शिवीगाळ करुन पतीने मला हाताने मारहाण केली. तर, जाऊ माझ्याविरोधात सासूला भडकावून कटरासस्थान करत होती, यासह विविध गंभीर आरोप फिर्यादीत केले आहेत. शिवाजीनगर पोलीस तपास करत आहेत.


ही बातमी शेअर करा.