Nigdi News : सर्वच क्षेत्रात स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी : अमोल भालेकर

ही बातमी शेअर करा.

Nigdi News : सर्वच क्षेत्रात स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी : अमोल भालेकर


शिवयोद्धा प्रतिष्ठाणतर्फे नवदुर्गांचा सन्मान

Pckhabar-डॉक्टर, वकील, पोलीस, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, सफाई कर्मचारी, घरकाम करणाऱ्या स्त्रिया अशा अनेक क्षेत्रात काम करून या सर्व स्त्रियांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. यांचा आदर्श घेऊन सर्व तरुण वर्गाने प्रगती करावी. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर, हेच औचित्य साधून आम्ही शिवयोद्धा प्रतिष्ठाणतर्फे नवदुर्गांचा सन्मान केला आहे, असे मत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल तुकाराम भालेकर यांनी व्यक्त केले.

रुपीनगर तळवडे प्रभागातील नवदुर्गांना ‘हिरकणी सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. स्त्री म्हणजे शक्तीचे स्वरूप, वात्सल्याचा झरा. या आधुनिक काळात देवीच्या विविध शस्त्रांप्रमाणे विविध जबाबदाऱ्या सांभाळून स्त्रिया सर्वच क्षेत्रात प्रगती करताना दिसून येतात.

अमोल भालेकर यांच्या कल्पनेतून अशाच विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांना ‘हिरकणी सन्मान’ प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक शुभांगी भालेकर, वृषाली भालेकर, सारिका भालेकर, राणी ढवळे, पुनम भोसले, स्नेहा शिलिमकर यांनी केले.


ही बातमी शेअर करा.