Talegaon Dabhade News: … तर बेकायदेशीर नळ कनेक्शन घेणार्‍यांवर फौजदारी गुन्हे  ः मुख्याधिकारी

ही बातमी शेअर करा.

Talegaon Dabhade News: … तर बेकायदेशीर नळ कनेक्शन घेणार्‍यांवर फौजदारी गुन्हे  ः मुख्याधिकारी


बेकायदेशीर नळ कनेक्शन घेणार्‍यांचे दाबे दणाणले
Pckhabar- तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 5 हजारपेक्षा अधिक बेकायदेशीर नळ कनेक्शन असल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. बेकायदेशीर नळ कनेक्शन घेतलेल्या नागरिकांनी दंड, अनामत रक्कम, पाणी पट्टी भरून अधिकृत कनेक्शन करून घ्यावे, अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, असा गर्भीत इशारा मुख्याधिकारी सतीश दिघे दिला आहे. त्यामुळे बेकायदेशीर नळ कनेक्शन घेणार्‍यांचे दाबे दणाणले आहेत.

  तळेगाव शहरात 32 हजार मालमत्ताधारक आहेत. यापैकी सुमारे 5 हजार नळधारकांनी बेकायदेशीर नळ कनेक्शन घेतल्याचे सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे. यापूर्वी अनेकवेळा नगर परिषद प्रशासनाने  बेकायदेशीर नळ कनेक्शन अधिकृत करून घेण्याच्या सुचना दिल्या होता. नागरिकांनी याला प्रतिसाद न देता नळ कनेक्शन सुरूच ठेवले. मात्र, नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी दिघे यांनी बेकायदेशीर नळ कनेक्शनधारकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

  मालमत्ता धारक 32 हजार असताना नळ कनेक्शनधारकांची संख्या कमी होती. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने शहरातील बेकायदेशीर नळ कनेक्शनचे सर्व्हेक्षण सुरू केले होते. याच सर्व्हेक्षणातून शहरात पाच हजार पेक्षा जास्त नळ कनेक्शन बेकायदेशीर असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या बेकादेशीर नळ कनेक्शनमुळे तळेगावातील पाणी पुरवठा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विस्कळीत होत आहे. बेकायदेशीर नळ कनेक्शन घेणार्‍यांनी नगर परिषदेचा लाखो रूपयांचा महसूल बुडवला आहे. त्यामुळे बेकायदेशीर नळ कनेक्शन घेतलेल्या नागरिकांनी दंड, अनामत रक्कम, पाणी पट्टी भरून नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे, अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा मुख्याधिकारी दिघे दिला आहे. मुख्याधिकार्‍यांच्या कडक भूमिकेमुळे बेकायदेशीर नळ कनेक्शन घेणार्‍यांचे दाबे दणाणले आहेत.


ही बातमी शेअर करा.