Pimpri RTO News : दसऱ्याच्या दिवशी RTO Office सुरू राहणार

ही बातमी शेअर करा.

Pimpri RTO News : दसऱ्याच्या दिवशी RTO Office सुरू राहणार


Pckhabar-दसऱ्याच्या दिवशी खरेदी करण्यात येणाऱ्या नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा ताबा मिळावा यासाठी वाहन नोंदणीचे व त्या आनुषंगिक करवसुलीचे कामकाज करण्याकरीता पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय १५ ऑक्टोबर रोजी सुरु ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतूल आदे यांनी दिली आहे.

वाहन चालवण्यासाठी आवश्यक शिकाऊ अनुज्ञप्तीची (लर्निंग लायसेन्स) मुदत ऑक्टोबर 2021 अखेर संपणाऱ्या उमेदवारांकरीता पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीकरीताच्या ऑनलाईन अपॉईंटमेंटचा प्रतिक्षा कालावधी कमी करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून 16 ऑक्टोबर रोजी पक्की अनुज्ञप्तीसाठी चाचणी घेण्यात येणार आहे. पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी 14 ऑक्टोबर रोजी सायं. 5 वाजता ऑनलाईन वेळ उपलब्ध होईल. त्या अनुषंगाने वेळ आरक्षित (स्लॉट बुक) करुन शनिवार 16 ऑक्टोबर रोजी चाचणीसाठी सकाळी 9 वाजता उपस्थित रहावे. येणाऱ्या उमेदवारांनी कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.


ही बातमी शेअर करा.