Pune News : जेष्ठ समाजसेवक प्रा डाॅ. अशोककुमार पगारिया यांना ‘समाज शिरोमणी’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

ही बातमी शेअर करा.

Pune News : जेष्ठ समाजसेवक प्रा डाॅ. अशोककुमार पगारिया यांना ‘समाज शिरोमणी’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Pckhabar- पिंपरी- चिंचवड जैन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ,जैन कान्फ्रेंसचे विश्वस्त व निवर्तमान राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा डाॅ अशोककुमार पगारिया यांना सपत्नीक सौ लता पगारिया यांच्या समवेत ” समाज शिरोमणी “हा राष्ट्रीय पुरस्कार भजन सम्राट अनुप जलोटा, प्रसिध्द अभिनेता रजा मुराद , सुर्यदत्ताचे अध्यक्ष डाॅ संजय चोरड़िया, जैन काॅन्फ्रेंस चे माजी अध्यक्ष अविनाशजी चोरड़िया, सुषमाजी चोरड़िया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह ,मानपत्र आणि शाल हे पुरस्काराचे स्वरुप होते.

वडगांव शेरी जैन स्थानक भवनामध्ये संस्कार भारती वाणी भुषण प पू प्रीतिसुधाजी, प पू मधुस्मिताजी म सा आदि साध्वींच्या सान्निध्यात सुर्यदत्ता फौंडेशनच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

प्रा अशोककुमार पगारिया हे गेली ३५ वर्षापासून सामाजिक , शैक्षणिक, धार्मिक आणि साहित्य क्षेत्रात अनेक संस्थांच्या माध्यमातून कार्यरत आहेत .त्यांच्या या कार्यांची दख़ल घेऊन अनेक शासकीय व अशासकीय संस्थांनी समाज भुषण, समाजरत्न ,अशोक रत्न, आदर्श शिक्षक, मदर टेरेसा अवार्ड , पी सी एम् सी आयकाॅन , सेवारत्न आदि पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. सुर्यदत्ता फौंडेशनच्या वतीने यावर्षी डाॅ.
रसिक सठिया, महावीर नहार, श्रीमती सुशिला बंब यांना मानव सेवा, समाज भुषण व समाज रत्न पुरस्कारांनी आणि श्री मोतीलालजी व सौ चंचलाजी सुराणा यांना आदर्श माता पिता पुरस्कारांनी सन्मानित केले. १२ वी तो उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा ही सत्कार करण्यात आला.

महासतीजी पू प्रीतिसुधाजी यांनी मंगलाचरण करून शुभेच्छा दिल्या. डाॅ संजय चोरड़िया यांनी प्रास्ताविक केले. रजा मुराद यांनी डाॅ संजय चोरड़िया यांच्या कार्यां चे कौतुक केले.

पुरस्काराथींच्या वतीने डाॅ अशोककुमार पगारिया ह्यांनी सुर्यदत्ताच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्यां चा गौरव केला व त्यांना धन्यवाद दिले. महासतीजी प पू मधुस्मिताजी म सा यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.


ही बातमी शेअर करा.