Pimpri News : सामाजिक मूल्यांची जपणूक करणारा गोंदण दीपावली विशेषांक : प्रा.रसाळ

ही बातमी शेअर करा.

Pimpri News : सामाजिक मूल्यांची जपणूक करणारा गोंदण दीपावली विशेषांक : प्रा.रसाळ
Pckhabar-सामाजिक मूल्य व सामाजिक बांधीलकी जोपासणारा गोंदण हा दीपावली अंक साहित्यिक गुणवतेने परिपुर्ण असल्याचे मत प्राचार्य रसाळ सरांनी व्यक्त केले.

कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या गोंदण या दीपावली विशेषांकाचे विज्ञान भवन चिंचवड येथे प्रा.रसाळ सर, उद्योजक चौधरी सर व साहित्यिक मा.श्री अरूण  बोर्‍हाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. रसाळ बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावरती शिवांजली साहित्यपीठाचे जेष्ठ साहित्यिक शिवाजीराव चाळक, कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार माळशिरसकर, प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य व साहित्यीक दादाभाऊ गावडे, प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष बापुसाहेब जाधव, सचिव ज्ञानेश्वर खैर, खजिनदार लक्ष्मण नलावडे उपस्थित होते.

  आगळ्या वेगळ्या प्रतिष्ठानची ही साहित्यिक व सामाजिक कार्याची चळवळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुध्दा कार्यरत राहिली ही अभिमानास्पद बाब असल्याचे साहित्यिक अरूण बोर्‍हाडे म्हणाले. अध्यक्षीय भाषणात  चौधरी सरांनी सद्यस्थितीत प्रतिष्ठानने राबविलेल्या उपक्रमाची प्रशंसा केली. एकाच ध्येयाने प्रेरीत झालेल्या माणसांचे सामाजिक बांधीलकीचे नाते व झपाटलेपणाने काम करण्याची वृती कौतुकास्पद आहे. गोंदणच्या माध्यमातून हे प्रतिष्ठान आपल्या कार्याचा ठसा साहित्य व समाज क्षेत्रावरती उमटवित आहे. 2020 व 2021 मधील उत्कृष्ठ कथा व कवितांना सन्मानचिन्हे व प्रशस्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्या उज्जवला पिंगळे यांनी केले. रंगतदार कवी संमेलनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

गोंदण दिपावली विशेषांक 2021 उत्कृष्ठ कथा व कविता पुरस्कार कथा
प्रथम पुरस्कार -विसावा – काशिनाथ माटल मुंबई
द्वितीय पुरस्कार -तारणहार प्रा.बी.एन.चौधरी जळगाव
तृतीय पुरस्कार -मैत्री -साहेबराव पवळे राजगुरूनगर
उतेजनार्थ पुरस्कार -जाणता प्रकाश संकुडे ,पालघर
करोना विवाह -शेषराव गोरे अहमदनगर
तडजोड -मीनल साकोरै शिरूर
कविता -प्रथम पुरस्कार -गोंदण -मंगल लेंडे  ,संगमनेर
द्वितीय क्रमांक – मीनाक्षी पाटोळे ,राजगुरूनगर
तृतीय क्रमांक – घसरण – डॉ.बाबासाहेब शिंदे,शिरूर
उतेजनार्थ -मैत्र -मीनल दतात्रय साकोरे ,शिरूर
आजी बोले नातवाला -आकाश भोरडे ,शिरूर
लंपडाव -प्रविण धाडसे, रोहा, रायगड

2020 चे उत्कृष्ठ कथा व कविता पुरस्कार
कथा-प्रथम क्रमांक -भाऊबीज -प्रा.बी.एन .चौधरी ,जळगाव
द्वितीय क्रमांक -दुभता बैल -सचिन बेंडभर ,शिक्रापूर ,पुणे
तृतीय क्रमांक -रिटायरमेंट -अर्चना बोरावके,
उतेजनार्थ -गुरूदक्षिणा -साहेबराव पवळे
अपशकुनी -मीनल साकोरे
दिसत तसं नसंत -मनोहर पोहरे
कविता-प्रथम क्रमांक -गोदंण -शिवाजीराव चाळक साहेब, शिवांजली साहित्यपीठ जुन्नर
द्वितीय क्रमांक -मित्र -अनंत राऊत
तृतीय क्रंमाक – गांजलेले -डॉ. अहेफाज मुलाणी देहूगाव
उतेजनार्थ -मन-मीनल साकोरे
बोचत राहतेजगणे असे -अरूण वाळुंज
सावता -डॉ.बाबासाहेब शिंदे


ही बातमी शेअर करा.