Pimpri News : शहर परिसरात घरफोड्यांचे सत्र थांबेना!


आठ चोरीच्या घटनात 12 लाखांचा ऐवज चोरीला
Pckhabar-ज्ञपिंपरी-चिंचवड शहर परिसरात दिवसेंदिवस घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड निर्माण होत असून पोलीस यंत्रणा काय करते? असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. शहरातील भोसरी एमआयडीसी, सांगवी, वाकड, चिखली, हिंजवडी, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या आठ घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमध्ये 12 लाख 20 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
डॉ. विवेक अनंतराव चिद्दरवार (वय 61, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिलन (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डॉक्टर असून त्यांचा कामगार असलेल्या आरोपी मिलनकडे फिर्यादीच्या बिल्डींगची रखवालीची जबाबदारी होती. मिलनने फिर्यादीच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून तीन तोळे आठ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, हातातील तीन घड्याळे, असा एकूण दोन लाख 28 हजार 600 रुपये किमतीचा ऐवज चोरी केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
नितीन रामचंद्र कदम (वय 49, रा. साई मल्हार कॉलनी, तापकीर नगर, काळेवाडी) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातून एक लाख आठ हजार रुपये किमतीचे तीन तोळे 6.390 ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरी करून नेले. वाकड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.
लखन श्रीरंग सूर्यवंशी (वय 21, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राम मंडलिक (वय 22, रा. पिंपळे गुरव) व एक अनोळखी इसम यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडा असताना आरोपींनी घरात प्रवेश केला. घरातून 80 हजारांची रोकड, दोन मोबाईल, असा एकूण 83 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
दिलीप विश्वनाथ जाधव (वय 35, रा. आनंदवन सोसायटी, थेरगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची 50 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्याने चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
वेस्ली वर्गीस (वय 19, रा. वल्लभ नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र रूमच्या दरवाजाची आतून कडी न लावता रूममध्ये झोपले होते. त्यावेळी चोरट्यांनी फिर्यादीचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल, अब्दुल्लाह उमर शेख बिस्मिल्लाह (वय 19) यांचा सात हजार रुपये किमतीचा मोबाईल, अभिजेय बी. (वय 20) यांचा नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल, शालिम स्वरूपकुमार शिंदे यांचा 40 हजार रुपये किमतीचा मोबाईल, असे एकूण 61 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल चोरून नेले.
संचिता केशव मोरे (वय 35, रा. सुदर्शन नगर चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची नजर चुकवून अज्ञात चोरटा त्यांच्या घरात घुसला. घरातून 89 हजार रुपये किमतीचे 27 ग्रॅमचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
पूनम राजाभाऊ भिसे (वय-25) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार लक्ष्मी व्यकंट मल्यालम (वय-23), निकीता देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी फिर्यादीचा 35 हजार रूपयांचा लॅपटॉप चोरून नेला.
शिवशांत सुभाषराव जाधव (वय-34, रा. नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या मामाचे घर कुलूप लावून बंद असताना चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील 12 तोळे, 4 ग्रॉम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा 5 लाख 66 हजार रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करत आहेत.






Leave a Reply