Ravet News : स्त्री शक्तीचा जागर करावा : दीपक भोंडवे

Ravet News : स्त्री शक्तीचा जागर करावा : दीपक भोंडवे
Pckhabar-महिलांमध्ये देवीची नऊ रुपे आहेत. तसेच  राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श आहे. महिलांनी आपल्यातील स्त्री शक्तीचा जागर करून येणाऱ्या संकटांवर मात करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे यांनी केले.

५६ रणरागिणींचा पुरस्कराने गौरव

नवरात्रोत्सव व जागतिक कन्या दिनाचे औचित्य साधून रावेत परिसरातील  विविध  क्षेत्रातील  एकूण  ५६ रणरागिणींना कर्तबगार महिला व कन्यांना ‘सन्मान स्री शक्तीचा’ पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  शाल, श्रीफळ व सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

सामाजिक कार्यकर्ते दीपक मधुकर भोंडवे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय शूटर प्राची गडकरी होत्या. अध्यक्षस्थानी अंजली जाधव होत्या. यावेळी   राष्ट्रवादी महिला बचत गट महासंघ अध्यक्ष शिला भोंडवे, कस्टम अधिकारी  सुवर्णा अथनीकर व  सुप्रिया भोंडवे उपस्थित  होत्या.  सूत्रसंचालन पुष्पा किटाळीकर यांनी केले.  पाहुण्यांचा परिचय समृद्धी  जाधव यांनी तर आभार  डॉ  अरुणा निकम  यांनी मानले.

रत्नाकर करंकाळ, सुरेश किटाळीकर, गणेश वारे, श्रीकांत नवले, श्रीकांत देशपांडे, अनिरुद्ध खन्नाडे, डॉ.  विठ्ठल चोपडे, सुनील भोंडवे, संतोष भोंडवे, धनंजय सोळुंके, अशोक करमारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *