Sangvi News : भक्ती कांबळे व ऋग्वेदा डोळस यांचा सत्कार

ही बातमी शेअर करा.

Sangvi News : भक्ती कांबळे व ऋग्वेदा डोळस यांचा सत्कार

मराठवाडा जनविकास संघ, धनंजय मुंडे युवा मंच व कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

Pckhabar-मराठवाडा जनविकास संघ (महा.राज्य) पिंपळे गुरव, धनंजय मुंडे युवा मंच पिंपरी चिंचवड शहर व कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान यांच्या संयुक्तपणे आयोजित कार्यक्रमात हवेत पंच मारण्याच्या प्रकारांमध्ये सिल्वर मेडल मिळविलेल्या भक्ती राजेंद्र कांबळे व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल ऋग्वेदा डोळस यांचा सत्कार करण्यात आला. मदतीचा धनादेश, स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी लागणाऱ्या पुस्तकांचे संच, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरूप होते.

यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, शिवाजी पाडुळे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, प्रा. संपत गर्जे, चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्याम जगताप, प्रा. विष्णू शेळके, युवा नेते अमरसिंग आदियाल, तानाजी जवळकर, अस्मिता कांबळे, विजय वडमारे, प्रशांत फड, किशोर आटर्गेकर, माजी उपसभापती राजू लोखंडे, सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी पुराणिक आदी उपस्थित होते.

वु-सू इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशन – इंडिया युनायटेड वर्ल्ड क्युवो-कुशिन-काय कराटे ऑर्गनायझेशन – साऊथ आफ्रिका ब्लॅक कॉब्रा निंजा मार्शल आर्ट्स अकॅडमी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या 1st वर्ल्ड ऑनलाईन मार्शल आर्टस टेक्निक चॅम्प चॅम्पियनशिप 2021 मध्ये कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त हवेत पंच मारण्याच्या प्रकारामध्ये भक्ती राजेंद्र कांबळे हिने दुसरा क्रमांक (सिल्वर मेडल) मिळविल्याबद्दल, तर ऋग्वेदा डोळस हिची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल, तसेच मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत ऋग्वेदा रघुनाथ डोळस हिने २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तुल इव्हेंट सिनियर वुमेन गटात २४७ गुण प्राप्त करून व्दितीय क्रमांक पटकावला त्याबद्दल या दोघींचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाडूळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत फड यांनी केले.


ही बातमी शेअर करा.