Chinchwad News : संत निरंकारी शांती आणि शिस्तीचे मिशन : महापौर माई ढोरे

Chinchwad News : संत निरंकारी शांती आणि शिस्तीचे मिशन : महापौर माई ढोरे

शिबिरात 80 जणांनी केले रक्तदान

Pckhabar- संत निरंकारी मिशन हे शांतीचे आणि शिस्तीचे मिशन आहे. मिशनच्या माध्यमातून केलेले रक्तदान शिबिराचे आयोजन हा स्तुथ्य उपक्रम आहे असे प्रतिपादन महापौर माई ढोरे यांनी केले.

संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन झोन पुणे सेक्टर पिंपरी अंतर्गत वाल्हेकरवाडी शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महापौर ढोरे बोलत होत्या. शिबिराचे उदघाटन संत निरंकारी मंडळाचे प. पु. गिरधारीलाल मतनानी (सेक्टर संयोजक पिंपरी) यांच्या हस्ते झाले. यावेळी प.पु.किशनलाल अडवाणी(क्षेत्रीय संचालक) प.पु. रामचंद्र लाड (ब्रँच मुखी वाल्हेकरवाडी) संत निरंकारी सेवादल आणि सत्संग उपस्थित होते.

या शिबिरात एकुण 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर रक्त संकलनाचे कार्य संत निरंकारी मंडळ रक्तपेढी मुंबई यांच्या माध्यमातून करण्यात आले.

रक्तदान शिबिरास विश्वजित खुळे (पोलीस निरीक्षक चिंचवड पो. स्टेशन) सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे श्रीधर वाल्हेकर, राजेंद्र साळुंखे, बीबीशन चौधरी, आदेश नवले यांनी सदिच्छा भेट दिली.

संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन 1986 साला पासुन देशा-विदेशात निरंतर करण्यात येत आहे. सध्या चालु असलेल्या कोरोंना महामारीच्या काळात मानवी जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यामध्ये रक्ताची कमतरता देखील जाणवत आहे याच पार्श्वभूमीवर सरकारी नियमांचे पालन करून फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्यात येणार आहे. शिबिराचे सूत्रसंचालन सुशांत चाळके यांनी केले. रामचंद्र लाड यांनी आभार मानले.