Talegaon Dabhade News :  6 लाख टन साखर उत्पादन होईल –  नानासाहेब नवले

Talegaon Dabhade News :  6 लाख टन साखर उत्पादन होईल –  नानासाहेब नवले

Pckhabar-संत तुकाराम सहकारी साखर कारखाण्याचा गळीत हंगाम येत्या 17 ऑक्टोबर रोजी सुरु होणार असून यावर्षी 6 लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज कारखान्याचे अध्यक्ष , माजी खासदार नानासाहेब नवले यांनी व्यक्त केला आहे.

कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे व त्यांच्या पत्नी छाया भेगडे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून संपन्न झाला.

यावेळी देहू देवस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले, जेष्ठ संचालक माउली दाभाडे, अनिल लोखंडे, तुकाराम विनोदे, बाळासाहेब कोळेकर, शिवाजी पवार, मधुकर भोंडवे, सुभाष राक्षे, शामराव राक्षे, नरेंद्र ठाकर, सुभाष जाधव, शुभांगी गायकवाड, ताराबाई सोनावणे, आदि संचालक व उस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

अध्यक्ष नवले म्हणाले कि ” कारखान्याचा यावर्षीचा 24 वा गळीत हंगाम असून या हंगामासाठी कार्यक्षेत्रातील मावळ, मुळशी, खेड, शिरूर, हवेली या तालुक्यातील उस उत्पादक शेतकर्‍यांकडून सुमारे 8 हजार हेक्टर क्षेत्रावर उस उत्पादन करण्यात आल्याने यावर्षी 6 लाख टन गाळपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आल्याचे नवले यांनी सांगितले.”

या गाळपाचे नियोजन एस.जी. पठारे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संचालक चेतन भुजबळ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *