IPL News : आयपीएलच्या क्वालिफायर्स आणि एलिमिनेटरचे सामने कोणामध्ये होणार जाणून घ्या

IPL News : आयपीएलच्या क्वालिफायर्स आणि एलिमिनेटरचे सामने कोणामध्ये होणार जाणून घ्या

Pckhabar- क्रिडा रसिकांना वेध लागले आहेत ते आयपीएलच्या प्ले-ऑफच्या सामन्यांचे. आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये दोन क्वालिफायर आणि एक एलिमिनेटर असे तीन सामने होणार आहे. त्यानंतर आयपीएलची अंतिम फेरी कोणत्या दोन संघांदरम्यान रंगेल हे स्पष्ट होणार आहे. हे तीन सामने आता कोणत्या संघांमध्ये होणार आहे, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

प्ले-ऑफमधील पहिली लढत ही दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये शनिवारी होणार आहे. या सामन्याला क्वालिफायर-१ असे म्हटले जाईल. आयपीएलच्या गुणतालिकेत पहिले दोन संघ या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकले जातील. त्यामुळे या सामन्यात जो संघ विजयी ठरणार आहे, त्यांना थेट आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे. त्याचबरोबर जो संघ पराभूत होईल, त्याला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी अजून एक संधी असेल. कारण या सामन्यात पराभूत झालेला संघ हा क्वालिफायर-२ या सामन्यासाठी पात्र ठरेल. पण त्यापूर्वी इलिमिनेटरचा सामना होणार आहे. हा एलिमिनेटरचा सामना गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या संघात होईल. त्यामुळे या सामन्यात आता आरसीबी आणि केकेआर हे दोन संघ खेळतील. या सामन्यात जो संघ पराभूत होईल, त्यांचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येणार आहे.

हा एलिमिनेटरचा सामना ११ ऑक्टोबरला रंगणार आहे. एलिमिनेटरमध्ये जो संघ विजयी होईल त्यांना क्वालिफायर-२ या सामन्यात खेळण्याची संधी मिळेल. क्वालिफायर-२ हा सामना १३ ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. या क्वालिफायर-२ या सामन्यात जो संघ विजयी ठरेल, त्यांना आयपीएलच्या फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळेल, त्याचबरोबर जो संघ पराभूत होईल त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागणार आहे.

त्यामुळे आता १०, ११ आणि १३ ऑक्टोबरला आयपीएलच्या प्ले-ऑफचे सामने होणार आहेत, तर आयपीएलची अंतिम फेरी ही १५ ऑक्टोबरला रंगणार असून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.