
Bhosari Crime News : 125 तोळे सोने, 83 लाख देऊनही सासरच्या मंडळींची हाव संपेना!
उच्च शिक्षित विवाहितेची आत्महत्या
Pckhabar-लग्नात 125 तोळे सोने, वेळोवेळी रोख 83 लाख रूपये देऊनही सासरच्या मंडळींना पैशांसाठी विवाहितेचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून उच्च शिक्षित विवाहितेने गळफास घेऊऩ आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मोशीतील रिचवुडस सोसायटीत घडली. याप्रकरणी पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
प्रिती अखिल असे आत्महत्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार विवाहितेचा पती अखिल विपीन (वय-33), सासू सुधा विपीन (वय-53, दोघे रा. फ्लॅट नं. 601, बी. विंग, रिचवुडस सोसायटी, मोशी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिलला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिती आणि अखिल यांच्या लग्नात फिर्यादी यांनी तब्बल 125 तोळे सोने दिले होते. आरोपींनी वेळोवेळी फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानुसार त्यांनी वेळोवेळी 83 लाख रूपये दिले. त्यानंतरही आरोपींनी प्रितीचा पैशांसाठी शाऱिरीक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून प्रितीने राहत्या घरी पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) पाटील अधिक तपास करत आहेत.






Leave a Reply