

Pune News : पाहुणे घरात आहेत, ते गेल्यानंतर माझी भूमिका मांडेन ; आयकर धाडसत्रावर उपमुख्यमंत्री पवार यांचा टोला
दुसऱ्या दिवशीही आयकरची छापेमारी सुरु
Pckhabar-पाहुणे घरात आहेत, ते आपले काम करत आहेत. ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन, जे सत्य आहे ते उघड होईल, अशी शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयकर खात्याच्या (Income Tax) धाडीवर आज ( शुक्रवार) त्यांनी पुण्यात प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी आयकरचं धाडसत्र सुरु आहे. याशिवाय अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने धाडी टाकल्या.ज्ञगेल्या 26 तासांपासून छापेमारी सुरु आहे. काल सकाळी 6 वाजल्यापासून सुरु असलेले धाडसत्र आजही सुरु आहे.
आज उपमुख्यमंत्री पुण्यात असून आयकरच्या छापेमारीवर अजित पवार म्हणाले, “पाहुणे घरात आहेत, ते आपले काम करत आहेत. ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन. जे सत्य आहे ते उघड होईल”







Leave a Reply