
Lonavala News : एकविरादेवी मंदिरात घटस्थापनेने नवरात्र उत्सवाला सुरवात
Pckhabar-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ला येथील कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या मंदिर हे नवरात्रत्सोच्या दिवशी भक्त भाविकांसाठी दर्शनासाठी खुले झाले असून आज घटस्थापनेने शारदीय नवरात्र उत्सावाला देखील सुरवात झाली.
वेहेरगाव दहिवली सरपंच अर्चना देवकर,उपसरपंच काजल पडवळ पोलिस पाटील अनिल पडवळ,सदस्या योगिता पडवळ,मुख्य पुजारी संजय गोविलकर, गुरव प्रतिनिधी नवनाथ देशमुख, काळूराम देशमुख,राजु देशमुख,मनोज देशमुख,गणपत पडवळ,मधुकर पडवळ,अशोक कुटे,संदिप देवकर,मोरेश्वर पडवळ,,शरद कुटे,नवनाथ पडवळ यांंच्यासह गुरव व पुजारी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत घटस्थापना झाल्या नंतर सकाळची आरती घेऊन नवरात्रत्सोला सुरवात झाली .
गेल्या दिडवर्षा पासून बंद असलेली मंदिरे आज भाविक भक्तांना दर्शनासाठी खुली झाली असल्याने महाराष्ट्रातील तमाम आगरी कोळी, कुणबी समाजाची तसेच ठाकरे घराण्याची कुलदैवत असणाऱ्या कार्ला एकविरा देवीचे दर्शन घेण्यासाठी आले असल्याने दर्शन रांगा भाविकांनी फुलून गेल्या होत्या.
एकविरादेवी मंदिर उघडणार असल्याने नवरात्रत्सोव सुरु होत असल्याने लोणावळा पोलिस प्रशासनाच्या वतिने बुधवारी रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
एकविरा देवस्थानचे प्रशासकीय व्यवस्थापक मंगेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बाळु गायकवाड, अरुण देवकर यांंच्यासह एकविरा देवस्थानचे कर्मचारी यांनी मंदिर परिसरात सुखसुविधा तसेच स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करत आहे.






Leave a Reply