
Chinchwad News : पिंपळे गुरवमध्ये शामभाऊ जगताप परिवाराच्या वतीने बैलपोळा उत्साहात साजरा

ग्रामस्थांनी विविध ठिकाणी केले बैलांचे पूजन
Pckhabar-पिंपळे गुरव येथील शामभाऊ जगताप परिवाराच्या वतीने बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामस्थांनी ठिकठिकाणी बैलांचे पूजन करून स्वागत केले.
प्रत्येक गावकरी मंडळीने कदम, जांभुळकर, नवले, कवडे, काशिद, देवकर, सांळुके, चव्हाण, जगताप परिवाराने बैलांचे पूजन केले. पारंपरिक पद्धतीने बैलांना बाशिंगे, हारतुरे, गळ्यामध्ये घुंगरांच्या माळा, आकर्षक रंगरंगोटी करून डोळ्यात काजळ भरून सुंदर सजवलेल्या बैलांची मिरवणूक काळभैरव मंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळी परीसरातील व घरातील महिलांनी बैलांचे औक्षण करून पूजन केले. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य खाण्यास दिला, तसेच सुपामध्ये ज्वारी घेऊन ती सर्व बैलांना खाण्यास देण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, युवा नेते तानाजी उर्फ पिंटुभाऊ जवळकर, युवा नेते अमरसिंग आदियाल, शांताराम जगताप, पंढरीनाथ काशिद, किसन जगताप, हनुमंत जगताप, दत्तात्रय जगताप, नरेश जगताप, सुमित जगताप, जनार्दन जगताप, रोहीदास जगताप, पै गणेश मधुकर काशिद, गणेश पोपट काशिद, अतुल काशिद, प्रविण मोहिते, पै हितेश जाधव, संकेत विधाते, प्रविण चव्हाण, अमित जगताप, राहुल चोथवे,
पै निखील जगताप, दिग्वीजय जगताप, प्रविण शिंदे, अभिषेक काशिद, बापू गांगार्डे, प्रसाद अंकुश, अनिकेत खोत, अमोल जाधव, शार्दुल सुर्यवंशी, शुभम विधाते, हिमांशु जगताप, आयुष जगताप, चिराग जगताप, कमलेश जगताप, सौरभ जगताप, शुभम पिंपळे, अजय केवट, परिमल क्षीरसागर, निलेश चव्हाण, प्रमोद निकाळजे, आलोक गिरमे, आकाश गायकवाड, तेजस मिरघे, हर्ष जाधव, सार्थक जगताप, निशांत फलके, बंटी भेगडे, शामभाऊ जगताप मित्र परिवार उपस्थित होते.







Leave a Reply