Pimpri News:  भाजपा युवा मोर्चातर्फे तरुणांसाठी ‘नमो प्रश्न मंजुषा’

Pimpri News:  भाजपा युवा मोर्चातर्फे तरुणांसाठी ‘नमो प्रश्न मंजुषा’

Pckhabar-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त शहरभरात “सेवा समर्पण अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी विभाग यांच्यातर्फे ‘नमो प्रश्न मंजुषा’ हा उपक्रम राबवून तरुणाच्या सामान्यज्ञानाला प्रोत्साहन देत त्यांचा सन्मान करण्यात आला.

भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी विभाग पिंपरी-चिंचवड शहर यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, भाजयुमो महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, विद्यार्थी विभाग प्रदेशाध्यक्ष डाॅ अक्षय पाटील, विद्यार्थी विभाग राज्य सहसंयोजक  स्वप्निल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध कोचिंग क्लासमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा संयोजक विद्यार्थी विभाग दिगंबर भानुदास गुजर, सहसंयोजक सुहास आढाव, अजय मोरे, अनिकेत शेलार, आप्पा घोगरे, अनिकेत मातेरे, पंकज जांगिड, अक्षय मोरे, निखिल नवले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आले. तसेच बरोबर उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सर्वच विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत अनेकांनी बक्षिसे पटकावली, यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह वाखण्याजोगा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *