Talegaon Dabhade News: शहरात आजपासून रस्ते दुरूस्ती मोहीम
Pckhabar- शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची व नव्याने करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामाला आज (बुधवार)पासून सुरुवात करण्यात येणार असल्याचे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी सांगितले.
तळेगाव शहरातील अनेक रस्ते नळ पाणी पुरवठा योजना आणि भुयारी गटर योजनेच्या कामामुळे खराब झाले आहेत. तसेच दीर्घकाळ पावसाने देखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
याचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे हे खराब झालेले रस्ते त्वरित दुरुस्त करावे. अशी मागणी नागरिकांकडून वेळोवेळी होत होती.
शहरातील एकूण खराब झालेल्या रस्त्या पैकी २४ रस्ते पहिल्या टप्यात दुरुस्त करण्यात येणार आहे. या सर्व रस्ता दुरुस्तीचे काम सुरु केल्यानंतर ते पूर्ण होई पर्यंत चालू राहील. ते वेळेत पूर्ण करावे असे आदेश ठेकेदाराला दिले असल्याचे मुख्याधिकारी दिघे यांनी सांगितले.
तळेगाव शहरात काही भागात अद्यापही भुयारी गटर व पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईन टाकण्याची कामे चालू आहे. हि कामे पूर्ण करून त्या ठिकाणाची देखील रस्त्याची कामे चांगली केली जाणार आहेत. नगर परिषदेने सुरु केलेल्या प्रत्येक रस्त्याच्या कामाची गुणवत्ता व उत्तम दर्जा याची कटाक्षाने प्रशासना कडून तपासणी केली जाणार असून नागरिकांनी काम सुरु असताना सहकार्य करावे, असे आवाहन दिघे यांनी केले.










Leave a Reply