Pimpri News: प्रवेशोत्सव कन्या विद्यालयातील, अशी पाखरे येती अन् शाळेत विसावती
Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय, पिंपरी वाघेरे या विद्यालयामध्ये कोरोना महामारी मुळे गेली अनेक महिने बंद असलेल्या शाळेमध्ये आठवी ते दहावी या इयत्ताचे वर्ग सोमवारपासून मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले.
सकाळी 9:30 वाजता इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनी विद्यालयात आल्या. त्यांच्या स्वागतासाठी शिक्षकांनी रांगोळ्या काढल्या होत्या, फुगे लावले होते, फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. ही स्वागताची तयारी पाहून सर्व मुली हरखून गेल्या होत्या. प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थी आणि त्यांचे पालक विद्यालय देण्यासाठी उत्सुक होते.
कन्या विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका शेटे एस.एस.यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. विद्यालयाच्या आदरणीय पर्यवेक्षिका पाटील यू बी आणि सकाळ सत्रातील सर्व अध्यापक यांनी सामाजिक अंतर राखत सर्व मुलींना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
त्याचप्रमाणे दुपार सत्रातही इयत्ता आठवीच्या मुलींचे शेटे एस. एस यांच्या मार्गदर्शनाने आदरणीय पर्यवेक्षिका पाटील यू बी व दुपार सत्रातील सर्व शिक्षकांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
कोविडच्या सर्व नियमांचे पालन करत, अतिशय उत्साहपूर्ण, आनंददायी वातावरणामध्ये विद्यार्थिनींचा प्रवेशोत्सव पार पडला.
दिनांक 4 ऑक्टोबर 2021रयत शिक्षण संस्थेला 102 वर्ष पुर्ण झाले. एक चांगला योगायोग म्हणजे याच दिवशी गेले अनेक महिने बंद असलेल्या शाळा सुरू झाल्या. हे फक्त आपल्या कर्मवीर अण्णा यांचे आशीर्वाद, असल्याची भावना सर्व शिक्षकांनी व्यक्त केली.










Leave a Reply