Chinchwad News : ऑनलाईन नृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण

Pckhabar- गणेश उत्सवानिमित्त मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने शहरामध्ये गणपतीच्या गाण्यावरती नृत्य करुन आॅनलाईन व्हिडीओ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिला गट 12 वर्षापर्यंत व खुला गटातील विजयत्याना सन्मानचिन्ह व रोख रक्कम बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले.

यामध्ये उरवी नाईक – प्रथम , सई इंगोले – द्वितीय , स्वरदा अणावकर – त्रितीय , आंकाक्षा वाडेकर – उत्तेजनार्थ स्पर्धक विजयी झाले.

या स्पर्धेकांचे परिक्षण मनसे चित्रपट सेनेचे शहरध्यक्ष प्रज्ञा पाटील व दत्ता घुले यांनी पाहिले. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हेमंत डांगे, उपाध्यक्ष अनिकेत प्रभू , आकाश लांडगे , सुमित कलापुरे, रोहित थरकुडे, शंतनु तेलंग, अनिल घोडेकर , सोमनाथ स्वामी, यश कुदळे आदी मान्यवर उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *