Facebook, Whatsapp, Instagram बंद पडल्याने मार्क झुकरबर्गला कोट्यवधीचा फटका!

Facebook, Whatsapp, Instagram बंद पडल्याने मार्क झुकरबर्गला कोट्यवधीचा फटका!

Pckhabar- फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा सोमवारी रात्री नऊ नंतर तब्बल सहा तासांसाठी ठप्प झाल्याने युजरर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.  सेवेमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे जगभरातील कोट्यवधी लोकांना याचा फटका बसला. या सहा तासात फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका बसला आहे. अवघ्या काही तासांच्या तांत्रिक गोंधळामुळे सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्येही मार्क एक स्थानाने खाली घसरला.

एका जागल्याने (व्हिसलब्लोअरने) कंपनीसंदर्भात केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे  सोमवारी उडालेल्या गोंधळामुळे मार्कला सुमारे 600 कोटी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. कंपनीच्या शेअर्सचीही मोठी पडझड झाली. सोमवारी झालेल्या या घसरणीमुळे मार्कची संपत्ती 12  हजार 160  कोटी डॉलर्सवर आली आहे. ब्लूमबर्गच्या श्रीमंताच्या यादीमध्ये मार्क एका स्थानाने खाली घसरला असून, तो आता बिल गेट्स यांच्यापेक्षाही एका स्थानाने खाली गेला आहे.

मार्क झुकरबर्गनेही सेवा पुन्हा सुरळीत होत असल्याची माहिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजर सेवा पुन्हा ऑनलाइन उपलब्ध आहेत. आज या सेवा पुरवण्यात आलेल्या अडथळ्यासाठी सॉरी. मला ठाऊक आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत संपर्कात राहण्यासाठी आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात, असे मार्कने म्हटले आहे.

तांत्रिक बिघाडामुळे फेसबुकसह इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअ‍ॅप या समाजमाध्यमांची सेवा बंद झाल्याने
twitter मीम्मसचा जोरदार पाऊस पडला होता. Facebook, Whatsapp, Instagram हे twitter  टाॅप ट्रेडींगमध्ये आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *