Nigdi News : या चिमण्यांनो परत फिरा रे…!; रूपीनगरमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, मास्क, पेन देऊन स्वागत
Pckhabar-शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचे दुसरे घरच. परंतु कोरोना महामारीमुळे तब्बल दीड वर्ष शाळा त्यांच्या या लेकरांविना सुन्या पडल्या होत्या. शासनाच्या निर्णयानुसार आज (सोमवार) विद्यार्थ्यांच्या आगमनासाठी शाळा पुन्हा सज्ज झाल्या.
अमोल तुकाराम भालेकर यांनी यानिमित्ताने ज्ञानदीप विद्यालय, रुपीनगर व राजा शिवछत्रपती विद्यालय, तळवडे येथे स्वागत कार्यक्रमाचे आयोजन केले. दीड वर्षांनी पुन्हा शाळेत पाऊल टाकणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, मास्क आणि पेन देऊन स्वागत करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करून अमोल भालेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. शाळेचा पहिला दिवस स्मरणीय केला.
प्रसंगी रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. शांताराम दगडू भालेकर, प्राचार्य श्री. सुबोध गलांडे, मुख्याध्यापक श्री. गोवर्धन चौधरी, दशरथ जगताप, सुभाष चौधरी, सौ. हेमलता सरोदे मॅडम, श्री. गिरीधर धांडे, श्री. रोहिदास शिंदे सर, श्री. रमेश हिवरे सर, श्री, सुनील गारगोटे सर, श्री, तिरकुंडे सर, श्री, शेळके सर, श्री. बाराथे सर इ. उपस्थित होते.
संस्था, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी अमोल भालेकर यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले. सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ भालेकर,उत्तम कांबळे,सर्व शिक्षक वृंदांचे मार्गदर्शन लाभले. शिवयोद्धा प्रतिष्ठाणच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.











Leave a Reply