Talegaon Dabhade News : सेवाधाम ग्रंथालय, मोफत वाचनालयाच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, उपाध्यक्षपदी नगरसेवक निखिल भगत
Pckhabar- सेवाधाम ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, उपाध्यक्षपदी नगरसेवक निखिल भगत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या नूतन कार्य करण्याची पहिली सभा नुकतीच पार पडली. यावेळी वाचनालय संगणीकृत करणे, आवारात सीसीटी कॅमेरे बसवणे, स्पर्धा परीक्षेची विशेष वर्ग सुरू करणे, नूतन अभ्यासिकेची दिवाळीत उद्घाटन करून सर्वासाठी खुली करणे, व बालसंस्कार वर्ग सुरू करणे, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रंथपाल बाळासाहेब भोसले उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष- सुरेश धोत्रे, उपाध्यक्ष निखिल भगत, सहसचिव- अतुल पवार, खजिनदार -कैलास काळे, सल्लागार- हरिश्चंद्र गडसिंग, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश साखळकर, हेमंत बेडेकर.
कार्यकारणी सदस्य मीनल कुलकर्णी,अमित बांदल, राजेश बारणे, यांची निवड करण्यात आली.










Leave a Reply