Akurdi News : रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे वृध्दाश्रमात औषधे वाटप

Akurdi News : रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे वृध्दाश्रमात औषधे वाटप
Pckhabar- रोटरी क्लब ऑफ आकुर्डी तर्फे प्राधिकरण येथील संत मोनीबाबा वृध्दाश्रम आणि किवळे येथील स्नेह सावली वृध्दाश्रमातील वृद्धांसाठी नियमित लागणारे औषधे देण्यात आली.

ही औषधे रोटरी क्लब ऑफ आकुर्डी तर्फे नियमितपणे देण्यात येतात. या प्रोजेक्टसाठी अध्यक्ष गौरव शर्मा, मेंबरशिप डायरेक्टर कल्याणी कुलकर्णी, पब्लिक इमेज डायरेक्टर सिमा शर्मा, अँडमिन डायरेक्टर अनिंदिता मुखर्जी, पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन श्री गूल सेवलानी, रोटेरियन गौतम शहा, राजेंद्र तुपे, अशोक मेहेर, वैशाली मेहेर उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमा अंतर्गत संत मोनीबाबा वृध्दाश्रम आणि किवळे येथील स्नेह सावली वृध्दाश्रमातील वृद्धांसाठी नियमित लागणारे औषधे मोफत देण्यात येतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *