Pimpri News : मनोज सावंत यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड

Pimpri News : मनोज सावंत यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड
Pckhabar- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीसपदी मनोज सावंत यांची नियुक्ती करण्यात आली.

सावंत यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र दिले.

यावेळी विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, उद्योजक विजय काटे, सरचिटणीस अमोल भोईटे, खजिनदार संजय लंके, माहेश्वरी सेलचे अध्यक्ष रामेश्वर लाहोटी, प्रशांत खुळे, विलास भोईर, राघवेंद्र खेडकर, दीपक जाधव, तात्यासाहेब शेवाळे , सुनिल पाटील, दिलीप गोते पाटील आदी उपस्थित होते.

नवनियुक्त सरचिटणीस मनोज सावंत म्हणाले” आपण पक्षाच्या स्थापनेपासून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. पक्षासाठी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन सरचिटणीस पदी नियुक्ती केल्याबद्दल आपण वरिष्ठ नेत्यांचे आभारी आहोत. यापुढील काळातही पक्षासाठी अधिक जोमाने कार्य करणार असल्याचे सावंत म्हणाले.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *