Pimpri News : आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सायकलिंग गरजेचे : आयुक्त राजेश पाटील

Pimpri News : आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सायकलिंग गरजेचे : आयुक्त राजेश पाटील

सायक्लोथॉन स्पर्धेला शहरातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद,तीन हजारहून अधिक स्पर्धकांनी घेतला सहभाग
Pckhabar-  ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटी लि. च्यावतीने आयोजित सायक्लोथॉन स्पर्धेत शहरातील ३ हजार पेक्षा जास्त  स्पर्धकांनी सहभाग घेतला. तीन गटात झालेल्या या स्पर्धेची सूरूवात निगडी भक्ती – शक्ती येथून सकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडी दाखवून झाली. स्पर्धेनंतर झुम्बा, योगा कार्यक्रमात सहभागी होवून स्पर्धकांनी आनंदोत्सव साजरा केला. तसेच, स्पर्धेत ८३ वयोवर्ष असलेल्या ज्येष्ठ स्पर्धकास सायकल भेट देण्यात आली.

यावेळी, उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, मनसे गटनेता सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिलाताई बाबर, माजी उपमहापौर शैलेजाताई मोरे, टाटा मोटर्स युनियन अध्यक्ष सचिन लांडगे, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, उपायुक्त मनोज लोणकर, सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क विभाग प्रमुख अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता विजय भोजणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रेरणा शिनकर, अ क्षेत्रिय अधिकारी सुजाता पानसरे, चंद्रकांत धानोरकर, सुनिल पवार, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थीत होते. स्पर्धेत अविरत श्रमदान संघटना, पतंजली योग समिती, झुम्बा क्लबने सहभाग घेतला.

शहरातील प्रदुषण टाळण्यासाठी व आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सायकल प्रवास गरजेचा आहे. शहरात सायकल चालवणाऱ्यांची संख्या वाढविण्याकरीता महापालिकेच्या माध्यमातून रस्ते, सायकल मार्ग तयार करण्याचे प्रयत्न सूरू आहेत. त्यासाठी नागरिकांनी देखील या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी केले. दि. १ ते ३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनांनुसार नऊ थीम्सच्या आधारावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आठही क्षेत्रिय कार्यालयांमार्फत आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

या तीन दिवसीस महोत्सवात नागरिकांना विविध कार्यक्रमांची मेजवानी लाभली. निगडी येथील रोटरी पुलाच्या अंडरपासमध्ये विद्यार्थ्यांनी थिम बेसीसवर वॉल पेंटींग पूर्ण केले आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींनी सुदधा सहभाग घेतला.
सायक्लोथॉन स्पर्धेचे स्वरुप राष्ट्रीयस्तराचे असून यामध्ये ५०० पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला. यात लहान मुले, सर्वसाधारण गट तसेच सराव करणा-या खेळाडूंसाठी ७ कि.मी., १५ कि.मी. आणि ७५ कि.मी. अंतराची स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे अंतर पूर्ण करणा-या खेळाडूंचा पदक देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्पर्धकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी महापालिका डॉक्टरांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली होती.

७५.०० किमी. साठी – भक्ती शक्ती चौक – निसर्ग दर्शन सोसायटी – पिंपरी चिंचवड इंजि.- कॉलेज इनरव्हिल चौक – धर्मराज चौक मार्गे – डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज – बास्केट ब्रिज चौक मुकाई चौक मुकाई चौकातुन डावीकडे मुंबई बेंगलोर पश्चिम बाह्यवळण मार्गे भुमकर चौक – भुमकर चौकातुन यु टर्न वाय जंक्शन देहुरोड – सोमाटणे फाटा टोलनाका सोमाटणे फाटा टोलनाक्या वरुन यु – टर्न वाय जंक्शन देहुरोड मुकाई चौकातुन – बास्केट ब्रिज रावेत ( संत तुकाराम महाराज पुल ) – डांगे चौक येथील उड्डाणपुलावरुन सांगवी फाटा येथील होरे पाटील अंडरपास मधुन यु-टर्न काळेवाडी फाटा – एम.एम.स्कुल चौक – एम्पायर इस्टेट उड्डाणपुल – इंडोलिक युरो सिटी कंपनी पासुन मा.आयुक्त बंगला – के.एस.बी चौक उड्डाणपुलावरुन कुदळवाडी स्पाईन रस्ता चौक – नाशिक रस्त्याकडे जय गणेश साम्राज्य चौकातुन यु-टर्न – साने चौकापासुन डाव्या हाताला वळुन थरमॅक्स चौक – उजवीकडे बळुन दुर्गानगर चौक – स्पाईन रस्ता – भक्ती – शक्ती चौक. असा मार्गक्रम होता.
१५ किमी सायक्लोथॉन साठी – भक्ती शक्ती चौक – निसर्ग दर्शन सोसायटी – पिंपरी चिंचवड इंजि.- कॉलेज इनरव्हिल चौक – धर्मराज चौक मार्गे – डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज – किवळे बीआरटीएस टर्मिनल – पुन्हा भक्ती शक्ती.
७ किमी सायक्लोथॉन साठी – भक्ती शक्ती चौक – निसर्ग दर्शन सोसायटी – आकुर्डी स्टेशन – संभाजी चौक- पुन्हा भक्ती-शक्ती याठिकाणी स्पर्धेचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *