Bhosari Crime News : काँग्रेस पदाधिकार्‍यासह मुलाला कोयत्याने तोडून टाकण्याची धमकी

Bhosari Crime News : काँग्रेस पदाधिकार्‍यासह मुलाला कोयत्याने तोडून टाकण्याची धमकी
Pckhabar- मालकाला न सांगता गावी गेलेल्या कामगाराच्या जागी दुसरा कामगार ठेवणार असल्याचे सांगताना एकाने काँग्रेसच्या पदाधिकार्‍याला आणि त्यांच्या मुलाला कोयत्याने तोडून टाकण्याची धमकी दिली. हा प्रकार मोशी येथे घडला. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

प्रविण सखाराम काकडे (वय-40, रा. गायकवाड वस्ती, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शहर काँग्रेसचे पदाधिकारी अशोक जयनारायण मंगल (वय-65, रा. चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रविण हा फिर्यादी यांच्याकडे कामाला होता. तो अचानक गावी निघून गेल्याने त्याच्या जागी फिर्यादी हे दुसरा कामगार ठेवणार होते. याबाबत आरोपीला माहिती देण्यास सचिन शिंदे यांना सांगितले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी व त्यांचा मुलगा आयुष मंगल यांना माझ्यासमोर बोलवा, कोयत्याने तोडून टाकतो, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *