Article By Dr. Ankush Jadhav : ‘ज्येष्ठ नागरिक दिवस’

Article By Dr. Ankush Jadhav : ‘ज्येष्ठ नागरिक दिवस’
आयुष्य आनंदात जगा।
कारण ते किती बाकी आहे
ते कोणालाच माहीत नसते.
वृद्धावस्था आनंदात घालवा व इतरांनाही आनंदात.
ठेवा, ठेवण्याची प्रेरणा द्या

Pckhabar- जगात वृद्धांबाबत होणारे गैर वर्तन व अन्याय रोखण्यासाठी दरवर्षी 1 ऑक्टोबर हा ’आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्र संघाने 14 डिसेंबर 1990 ला घेतला. यापूर्वी 1982 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने ’वृद्धावस्था आनंदी करा’ हा नारा देऊन सर्वांसाठी आरोग्य मोहीम सुरू केली होती. या दिवशी ज्येष्ठांच्या प्रती आदर व्यक्त केला जातो. भारतात काही वर्षे हा दिवस महात्मा गांधींच्या जयंती दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबला ला साजरा केला जात होता. भारतात 1951 साली 2 कोटी, 2001 साली 7.6 कोटी तर 2011 साली 10.4 कोटी तर सध्या 13 कोटी पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. येत्या 10 वर्षात ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत 41 टक्क्यांनी वाढ होणार आहे.

सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेक वृद्धांना उपेक्षित करण्यात येत आहे. एकाकीपणाचा परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत आहे. दिवसेंदिवस रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जात असल्याने अनेक शारीरिक व मानसिक आजार होतात. त्यात प्रामुख्याने पचन संस्थे संबंधित रोग पुरूष 5.8-स्त्री. 6.4, श्वसन संस्थेचे रोग पुरूष 32.2- स्त्री.29.4, मज्जा (चेता) संस्थेचे रोग 10.8-स्त्री.19.9, रक्ताभिसरण संबंधित रोग पुरूष 21. 8 -स्त्री.22.5, अन्य आजार पुरूष 14.8- स्त्री.16.4 होतात. हेच प्रमाण तरुणांमध्ये अर्धे आहे. साधारणतः 6.9टक्के वृद्धांमध्ये एकावेळी एकच आजार, 75. 5 टक्के वृद्धांमध्ये एकाच वेळी 2 ते 3 आजार,13.2 वृद्धांमध्ये 4 आजार दिसून येतात. सामान्यतः कॅन्सर, संधिवात, भ्रम, बद्धकोष्ठता, मूत्रपिंडाचे विकार, खोकला, कंप, मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थिभंग, मोतीबिंदू, अर्धांगवायू, प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होणे, ह्रदय विकार-धमनीचे रोग, हाडे ठिसूळ होने. इ. शारीरिक तर बुद्धिभेद, नैराश्य, अल्झेमार इ. मानसिक आजार होतात.

सामान्यतः जे लोक एकाच वेळी विविध आजारांसाठी सहा औषधे घेतात त्यांच्यात 18 टक्के तर सहा पेक्षा अधिक औषधे घेतात. त्यांच्यात 80 टक्के औषधांचे दुष्परिणाम दिसून येतात. या प्रकारच्या होणार्‍या दुष्परिणामुळे 10 ते20 टक्के लोकांना रुग्णालयात भरती होतात तर 5ते 12 टक्के लोकांना भरती करणे आवश्यक असते.

रोगाच्या अत्यायकी अवस्थेत अवस्थेत अलोपॅथिक उपचार अवश्य घ्यावेत. परंतु नंतर आयुर्वेदिक उपचार घ्यावेत. आयुर्वेदिक उपचार बरेच दिवस, महिने घ्यावेत. हृदय रोग,रक्तदाब इ. आजारांसाठी तुम्ही आयुष्य भर उपचार घेताच ना? वृद्धावस्थेत आयुर्वेदानुसार वात दोषाचे अधिक्य असते. या वात दोषाचे शमन करणारा आहार घेणे आवश्यक असते. गोड, आंबट व खारट हे तिन्ही दोष वात दोषाचे शमन करतात. (मर्यादेत खावेत)

जुने तांदूळ, गहू, ज्वारी, जव, मूग, उडीद, कारले भोपळा, दोडकासुरण, पालक, द्राक्षे, डाळिंब, खजूर, खोबरे, दूध, लोणी, तूप, तीळ, मध, आले, लसूण, पुदिना, दालचिनी, शेंगदाणे, वेलची, सैंधव मीठ, मटानाचे सूप इ.पदार्थांचा आहारात समावेश करावा. सामान्यतः सर्व प्रकारच्या तपासण्या नियमित कराव्यात.त्यात संपूर्ण रक्त, साखर, कोलेस्टेरॉल, युरीक ऍसिड, प्रोटेईन्स इ. तपासण्या कराव्यात. फार गडबडीने वा फार संथ पणे जेवू नये. फार थंड पाणी पिऊ नये. भूक लागलीच तर खा, केवळ नेहमीची वेळ झाली म्हणून खाऊ नका, तहान लागलीच तर पाणी प्या. भरपेट, भरपूर खाण्याचे टाळा. अनियमित जेवू नये, इन्स्टंट पदार्थ, चायनीज पदार्थ खाऊ नयेत. मानसिक ताण तणाव, नैराश्य, भविष्याची चिंता इ.करण्याचे टाळावे. शक्यतो झोप पूर्ण झाल्यावरच उठावे. कार्यरत रहावे.
– डॉ. अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *