IPL News: के. एल. राहूलचे अर्धशतक; पंजाबचा कोलकाता नाईट रायडर्सवर शानदार विजय
Pckhabar- इंडियन प्रीमीयर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात शुक्रवारी रात्री खेळवला गेला. या सामन्यात कर्णधार केन. एल. राहूलच्या दमदार अर्धशतकामुळे पंजाबने 5 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे त्यांनी प्लेऑफच्या शर्यतीतील आपले स्थान कायम ठेवले आहे. तसेच त्यांच्या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सचा मात्र मोठा फायदा झाला असून ते प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. चेन्नई सुपर किंग्सनंतर आयपीएल 2021 प्लेऑफसाठी पात्र ठरणारा दिल्ली दुसरा संघ ठरला.
या सामन्यात कोलकाताने 20 षटकांत 7 बाद 165 धावा केल्या आणि पंजाबसमोर 166 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग पंजाबने 19.3 षटकांत 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केला. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने अर्धशतकी खेळी केली.
पंजाबकडून 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कर्णधार केेएल राहुल आणि मयंक अगरवाल यांची सलामी जोडी मैदानात उतरली. या दोघांनी पंजाबला दमदार सुरुवात करुन दिली. त्यांनी अर्धशतकी सलामी भागीदारी केली.
व्यंकटेश अय्यरचे अर्धशतक
या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोलकाता संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिलने डावाची सुरुवात केली होती. पण, गिलला तिसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने 7 धावांवर त्रिफळाचीत करत मोठा धक्का दिला. पण यानंतर अय्यरने राहुल त्रिपाठीसह शानदार फलंदाजी करताना संघाचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारीही केली.
या दोघांची भागीदारी रंगत असतानाच रवी बिष्णोईने दीपक हुडाकरवी त्रिपाठीला झेलबाद केले. त्याने 26 चेंडूत 34 धावांची खेळी केली. त्याच्या बाद होण्याने दुसऱ्या विकेटसाठीची 72 धावांची भागीदारी तुटली. पण, यानंतर 13 व्या षटकात व्यंकटेश अय्यरने त्याचे अर्धशतक पूर्ण केले.
पण, अर्धशतकानंतर तो 15व्या षटकात रवी बिष्णोईच्या गोलंदाजीवर दीपक हुडाकडे झेल देऊन बाद झाला. त्याने 9 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याच्यानंतर कोलकाताच्या फलंदाजांना एकामागोमाग विकेट्स गमावल्या. 16 व्या षटकात कोलकाताचा कर्णधार ओएन मॉर्गनला मोहम्मद शमीने 2 धावांवर पायचीत केले. 18 व्या षटकात नितीश राणाने 18 चेंडूत 31 धावा करुन विकेट गमावली.










Leave a Reply