Pimpri News : परदेशातील अनुकरण करून संरक्षण क्षेत्रात खाजगीकरणाचे प्रयत्न:  पिसे

Pimpri News : परदेशातील अनुकरण करून संरक्षण क्षेत्रात खाजगीकरणाचे प्रयत्न:  पिसे
Pckhabar- मिळेल ते काम करण्याचे आव्हान स्वीकारल्यामुळेच आज हे वर्कशॉप जिवंत आहे. परदेशातील अनुकरण करून सरकार संरक्षण क्षेत्रात खाजगीकरण करू पाहात आहे. मात्र, या बदलाला कामगार जबाबदार नसून त्याला व्यवस्था जबाबदार आहे. तुमच्या स्वाभिमानाला आव्हान करतो की, ठामपणे  स्पष्ट बोलण्याची हिम्मत ठेवा तसेच भविष्यातील आव्हाने स्वीकारून निर्भिडपणे मार्गक्रमण करीत राहा, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष जी.टी.पिसे यांनी केले.

असोसिएशन ऑफ दि सिव्हीलियन एम्प्लॉइज ऑफ 512 कमांड आय.ई.एम.ई. वर्कशॉप, खडकी  या संघटनेचा स्थापना दिनाचा अमृत महोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी गोपाळराव पिसे, रवींद्र रेड्डी, नितीन जगनाडे, सुधीर फेंगसे, राजेंद्र परदेशी, रमेश पवार, सी.ए. तांबोळी, संजय मोकाशी, विद्याधर शिंदे, शिवाजी जावळकर, खालीद शेख, नंदकुमार लोंढे, आबासाहेब ढोले, विक्रांत गवळी आदी उपस्थित होते. स्वातंत्र्यपूर्व काळात कामगारांना संघटित करून एस. एम. जोशी , नानासाहेब गोरे , विनायकराव कुलकर्णी, के. एम. मॅथ्यू, अण्णा तेलगू , जे.डी. सूर्यवंशी या नेत्यांनी  1946 साली  ही संघटना स्थापन केली. संघटनेच्या अमृतमहोत्सवानिमित्त दीपप्रज्वलन करून अमृत अमृतमहोत्सवी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

रविंद्र रेड्डी  म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात ट्रेड युनियन स्थापन करण्याची परवानगी नव्हती. मात्र आपल्या जाणत्या नेत्यांनी ब्रिटीश अधिकार्‍यांचा विरोध असताना सुद्धा ही संघटना स्थापन केली. आज अमृतमहोत्सव साजरा करताना आनंदासोबत भविष्यातील आव्हानांची चिंता मनात घर करून आहे. सरकारची खाजगीकरणाची भूमिका ही कामगारांना देशोधडीला लावणारी आहे. कामगार विरोधी कृती करिता आंदोलने उभी करून आवाज उठवायला हवा.

प्रास्ताविक नितीन जगनाडे यांनी केले. सूत्रसंचालन महेश पवार यांनी तर संतोष क्षीरसागर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यास संघटनेच्या आजी-माजी पदाधिकारी , सर्व फोरमचे पदाधिकारी आणि प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *