Chinchwad Crime News : anydes app डाउनलोड केले अन् बॅकेच्या खात्यावरून सव्वा दोन लाख गायब!
Pckhabar- तरूणाचे yono app चालत नसल्यामुळे ऑनलाईन कस्टमर केअरशी संपर्क साधल्या नंतर anydes app डाउनलोड करण्यास सांगून दोन बॅकेच्या खात्यावरून सव्वा दोन लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून फसवणूक केली. ही घटना
28 सप्टेंबर रोजी चिंचवडगाव येथे घडली.
याप्रकरणी रविराज सतिश कर्णे (वय-32, रा. चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी yono app वापरतात. ते app चालत नसल्यामुळे ऑनलाईन कस्टमर केअरशी 9339601192 या मोबाईल धारकाची संपर्क साधला. त्या व्यक्तीने anydes app डाउनलोड करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी anydes app डाउनलोड केले. फिर्यादी यांनी फोन पे या अॅप वर बॅलेन्स चेक केला तर फि यांचे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा एम आय डी सी सातारा या अकाउंटला बॅलन्स 10 रु दाखवित होता. बँकेत चौकशी केल्यानंतर त्यांना समजले की फि यांचे सेव्हीग अकाउंटवरिल वरिल व फिक्स डिपॉझीटवरिल लोन केलेले पैसे हे अकाउंट नं 31662960569 व अकाउंट32962463275 यावर ट्रन्सफर झाले होते. तसेच एटीएम मधुन देखील 20 हजार रुपये काढलेले होते. फिर्यादी यांची एकुण 2 लाख 27 हजार 550 रुपयांची फसवणुक झाली.
पोलीस निरीक्षक खुळे अधिक तपास करत आहेत.










Leave a Reply