Sangvi News : सांगवीत सलग 75 तास लसीकरण मोहीमेला सुरूवात
Pckhabar- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सलग 75 तास लसीकरण मोहीमे अंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी संगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपलिका व 3 M कंपनीच्या संयुक्त विद्यमाने सांगवी येथील निळू फुले नाटयगृह येथे सुरु करण्यात आलेल्या लसिकरण केंद्राचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, नगरसेविका माधवी राजापुरे, शारदा सोनवणे, माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, ‘ह’ क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी विवेक थोरात, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, सीएसआर सेलचे विजय वावरे आदी उपस्थित होते.
आपल्या नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे तसेच कोणीही लसीकरणा पासून वंचीत राहू नये या करीता महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येत असून या मोहीमेसाठी वैद्यकिय विभाग खूप मोलाचे काम करीत असलेबाबत महापौर माई ढोरे यांनी समाधान व्यक्त केले.
महानगरपालिकेच्या वतीने निळू फुले नाट्यगृह सांगवी येथे आज (गुरूवार )पासून सलग 75 तास नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.










Leave a Reply