Talegaon Dabhade News : नगराध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे शहराचा विकास खुंटला : विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांचा आरोप
Pckhabar- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे या मनमानी पध्दतीने कारभार करत आहेत. असा आरोपच सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीच केला आहे. भाजपच्या अंतर्गत वादामुळे तळेगाव शहराचा विकास खुंटला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला गटनेते किशोर भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, संगीता शेळके, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष खांडगे उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते काकडे पुढे म्हणाले, की नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी दि. २८ सप्टेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन केले होते. परंतु या विशेष सभेसाठी भाजपच्या सदस्यांनीच विरोध केला. यामुळे विकास कामासाठी घेतलेली विशेष सर्वसाधारण सभा गणपूर्तीअभावी नगराध्यक्षांना रद्द करावी लागली. नगराध्यक्षा व सत्ताधारी भाजपचे नगरसेवक यांच्यामध्ये एक विचार नसल्याने तळेगावच्या विकासाचे विषय लांबणीवर पडले आहेत.
किशोर भेगडे म्हणाले, की सत्तेमध्ये एका विचाराचे सदस्य असतील तर शहराचा विकास साध्य होतो. मी शहराच्या विकासाचा दूरदृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून उपसूचना दिल्या. याचा अर्थ मी विकासकामांना विरोध करतो असा होत नाही. इंद्रायणी जॅकवेलच्याबाबत देखील उपसूचना दिल्या होत्या. त्या विचारात न घेतल्याने आज तळेगाव स्टेशन परिसरातील नागरिकांना दूषित पाणी मिळत आहे.










Leave a Reply