Pimpri News : पिंपरीत उद्या ‘नोकरी व कौशल्य विकास मेळावा’
Pckhabar-लायन्स क्लब इंटरनॅशनल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, युनिक स्किल डेव्हलपमेंट आणि शेखर चिंचवडे युथ फौंडेशन स्टाफ ब्लूम यांच्या कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत उद्या (गुरुवार) नोकरी व कौशल्य विकास मेळावा-५चे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रकल्प प्रमुख लायन अशोक येवले यांनी दिली.
उद्या गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक कामगार भवनाच्या शेजारी येथे हा मेळावा होणार आहे.
या मेळाव्यात 8 वी / 10 वी / 12 वी / DIPLOMA / ITI / GRADUATE जास्तीत जास्त तरूण-तरूणींनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्प प्रमुख लायन अशोक येवले यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी 7558562963/8956140702 या नंबर वर संपर्क साधावा.










Leave a Reply