Pimpri News : तलावात बुडणाऱ्या दोन मुलांना वाचवणाऱ्या आयुषचा महापौरांच्या हस्ते सत्कार

Pimpri News : तलावात बुडणाऱ्या दोन मुलांना वाचवणाऱ्या आयुषचा महापौरांच्या हस्ते सत्कार

Pckhabar- आयुष तापकीर या सदगुरुनगर, भोसरी येथे राहणाऱ्या १३ वर्षाच्या मुलाने तलावात बुडणाऱ्या तीन मुलांना पाहिले आणि प्रसंगावधान राखून मोठ्या धाडसाने आणि शौर्याने त्यांना पाण्याबाहेर काढले. त्यामुळे त्यातील दोघांचा जीव वाचला या त्याच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्याचा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते महापौर कक्षात त्याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जैव विविधता व व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उषा मुंढे, माजी स्थायी सभापती संतोष अण्णा लोंढे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, आयुषचे वडील गणेश तसेच त्याची आई व नातेवाईक उपस्थित होते.
आयुषच्या या कामगिरीची दखल घेऊन त्याची बाल शौर्य पुरस्कारासाठी  सन्माननीय राष्ट्रपती महोदयांकडे शिफारस करण्यात येणार आहे.

आयुष तापकीर याने वयाच्या ३ वर्षापासून जलतरणाचे धडे घेतले असून त्याला घोडेस्वारी व कुस्तीची आवड आहे. कुस्तीमध्ये त्याला २ सन्मानचिन्ह व २ पदके मिळालेली आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *