Pimpri News :  युवा सेनेकडुन पर्यावरण मंत्री  आदित्य ठाकरे यांचे शहरामध्ये जोरदार स्वागत

Pimpri News :  युवा सेनेकडुन पर्यावरण मंत्री  आदित्य ठाकरे यांचे शहरामध्ये जोरदार स्वागत
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर आलेले पर्यटन, पर्यावरण, वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे युवा सेनेने जोरदार स्वागत केले. युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे आणि युवासेना शहर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.

आकुर्डीत स्वागत मंडप उभारला होता. पिंपरी-चिंचवड शहर युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांचा जगद्गगुरु संत तुकाराम महाराज यांची मूर्ती भेट देऊन सत्कार केला. पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना संपर्कप्रमुख, माजी मंत्री सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, युवासेना विस्तारक राजेश पळसकर, शर्वरी जळमकर, शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले, जिल्हा समन्वयक अनिकेत घुले, शहर समन्वयक रूपेश कदम, विधानसभा अधिकारी माऊली जगताप, निलेश हाके, राजेंद्र तरस, प्रतिक्षा घुले, अभिजित घोफण, निखील यवले, केदार चासकर, सुरज लांडगे, कुणाल जगनाडे, नितीन पाटील, अजिंक्य उबाळे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री ठाकरे आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवड शहराच्या दौ-यावर आले होते. चिंचवड एमआयडीसी येथील कायनेटीक ग्रीन एनर्जी अ‍ॅण्ड पॉवर सोल्युशन आणि टाटा मोटर्स कंपनीला त्यांनी भेट दिली. तत्पूर्वी, युवा सेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. युवा सेनेकडून वातावरणनिर्मिती केली. भक्ती-शक्ती पुलाच्या सुरुवातीला स्वागत कमान उभारली होती. आदित्य ठाकरे यांच्या शहर दौऱ्यामुळे युवा सेनेत उत्साह पाहायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *