Pimpri News : डेंग्यू डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी पाण्याची टाकी, फ्रिज, कुलर, कुंड्या स्वच्छ ठेवा
Pckhabar- डेंग्यू डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले असून क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने जाधववाडी चिखली परिसरांत जनजागृती रॅली काढून प्रबोधन केले.
यावेळी माजी महापौर राहूल जाधव, नगरसेविका अश्विनी जाधव,सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॅा सुनिता साळवे, सहाय्यक आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे,विजय दवाळे, सुनिल माने, वैभव कांचनगौडार, राजेंद्र उज्जैनवाल आदी उपस्थित होते.
बोल्हाई मळा जाधवाडी चिखली या ठिकाणी कंटेनर सर्व्हेक्षण मोहिम राबविणेत आली घरोघरी कंटेनर सर्व्हेक्षण करताना घरांमधील पाण्याची टाकी,फ्रिज, कुलर, कुंड्या आदी गोष्टींची तपासणी करून याबाबत डेंग्यु/ मलेरीया डासांच्या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करून त्याबाबत डेंग्यु/ मलेरीयाचे माहिती पत्रक वाटण्यात आले.
प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून घरातील पाण्याची टाकी, फ्रिज, कुलर, कुंड्या इत्यादी गोष्टीं आठ दिवसांतुन एकदा रिकामे करून कोरडे करून स्वच्छ ठेवावे याबाबत अवाहन करणेत आले आहे. या जनजागृतीपर रॅलीला नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला.










Leave a Reply