Pimpri News : महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड!

Pimpri News : महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड!

8 टक्के बोनस, 20 हजार सानुग्रह अनुदान जाहीर
Pckhabar-  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 8.33 टक्के बोनस आणि 20 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मंगळवारी महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

यावेळी स्थायी समितीचे सभापती ऍड. नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके,  कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, गणेश भोसले आदी उपस्थित होते.
सन २००५ पूर्वी दरवर्षी पिंपरी मनपा कर्मचाऱ्यांना बोनस व सानुग्रह अनुदान वाटप करण्यात येत होते करार केला जात नव्हता. सन २००५ साली कर्मचारी महासंघाच्या वतीने

महापालिका प्रशासनाबरोबर करार करण्याची प्रथा बबन झिंझुर्डे यांनी सुरू केली. सन २०१६ साली प्रत्येक कर्मचाऱ्यास प्रथा बोनस व सानुग्रह अनुदान १५०००र रुपये देण्याचा करार पाच वर्षासाठी करण्यात आला. तो करार यावर्षी संपुष्टात आला. सोमवारी सांयकाळी महापालिका आयुक्त दालनात महापौर माई ढोरे, स्थायी समितीचे सभापती ऍड. नितीन लांडगे, पक्षनेता नामदेव ढाके, नगरसेवक राहुल कलाटे व आयुक्त राजेश पाटील यांच्याबरोबर कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱयांची बैठक झाली.

 महासंघाने प्रत्येक कर्मचाऱ्यास ३० हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी केली. यावेळी महापौर माई ढोरे यांनी मध्यस्थी करत २० हजार सानुग्रह अनुदान देण्याची सूचना केली. यावर आयुक्तांनी पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येक कर्मचाऱ्यास प्रत्येकी २० हजार रुपये सानुग्रह अनुदान  देण्याचे मान्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *