Maval News : कवी विठ्ठल दळवी यांना राज्यस्तरीय ‘प्रतिष्ठा साहित्य सेवारत्न पुरस्कार’ प्रदान

Maval News : कवी विठ्ठल दळवी यांना राज्यस्तरीय ‘प्रतिष्ठा साहित्य सेवारत्न पुरस्कार’ प्रदान

Pckhabar- महाराष्ट्र राज्य लोकसेवा महासंघ कविभुषण पुरस्कार प्राप्त दारुंब्रे शाळेतील कोथुर्णे, सोमाटणे गावचे सुपुत्र विठ्ठल रामू दळवी यांच्या सेवाभावी कार्याचा व सुप्त गुणांचा, विचारांतून जागृती करण्याचे काम व त्यांची ही देशाविषयीची तळमळ पाहून त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेत. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेऊन त्यांना नुकताच पुणे प्रतिष्ठान फाउंडेशन राज्यस्तरीय साहित्य संमेलन २०२१ तासगांव, जि-सांगली येथे प्रतिष्ठा साहित्य सेवारत्न पुरस्कार २०२१ सन्मान प्रदान करण्यात आला.

साखर आयुक्त, शेखर गायकवाड , महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील,ज्येष्ठ व आदर्श साहित्यिक
दि. बा. पाटील यांच्या हस्ते कवी दळवी यांना पुरस्कार देण्यात आला.

दळवी यांनी कसलीही तमा न बाळगता आपल्या सुंदर लेखणीतून कोरोनाचा पृथ्वीवर शिरकाव, एका विषाणूनं काय शिकवलं, शिवरायंचा धगधगता इतिहास, प्राचीन संस्कृती, मराठी भाषेची हेळसांड, शेतकरी आत्महत्या, संतांची महती अशा अनेक विषयांवर आपले प्रभावी लेखन सुरु करुन समाजाला विचारांशिवाय पर्याय नाही, संतांप्रमाणे समाजाची सेवा कशी करावी, शिवरायांचे पवित्र शिवचरित्राचा अभ्यास का करावा व ते अभ्यासक्रमात का आणावे, यातून समाजाने काय बोध घ्यावा, पृथ्वीवर सुरु असलेला पर्यावरणरुपी –हास, वन्यजीवांना न मिळणारी जागा अशा अनेक विषयांवर लेखन सुरु करुन महाराष्ट्राच्या कानाकोप-यात जाऊन, कविसंमेलने, साहित्य संमेलने, समारंभ, विद्यार्थ्यांसमोर, समाजापुढे मांडत १६ पुरस्कार मिळवत, विचारांचे अभंग रचत, एक हजारच्या वर काव्यरचना करुन संतसाहित्यतून, विचारांतून, पवित्र शिवचरित्रातून, प्राचीन संस्कृतीतून संपूर्ण देश सावरण्याचा प्रभावी मानस असून तसेच ५१ पुस्तक प्रकाशनाच्या दिशेने योग्य वाटचाल सुरु असून लवकरच हे प्रभावी कार्य समाजापुढे आणण्याचा मानस आहे.

आतातरी प्रत्येकानं मराठी भाषेचा आदर करुन न संतांच्या पवित्र ग्रंथांचा मार्ग धरुन, मराठी भाषेचा महान अशा संस्कृतीचा जयजयकार करुन तसेच इंग्रजी भाषेचा अट्टहास कमी करुन परकीय संस्कृतीचा त्याग करुन जगातील महान अशा हिंदू संस्कृतीचा पुन्हा मार्ग धरुन अभ्यास तसेच प्रभुरामचंद्रांच्या सत्याचा मार्ग धरावा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचा पुन्हा अभ्यास करुन हेच पवित्र शिवचरित्र शालेय अभ्यासक्रमात यावे यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावा. देशातील थोर संतांच्या ग्रंथांतून, शिवचरित्रातून, संविधानातून पवित्र संस्कृतीतून प्रत्येकानं काहीतरी बोध घेऊन विचारांची ताकद संपूर्ण जगाला दाखवून विचारांतून देश घडावा असा मानस डोळ्यासमोर ठेऊन यासाठी प्रत्येकानं देश सेवेसाठीचा खारीचा वाटा उचलावा, आतातरी प्रत्येकानं हिंदू संस्कृतीचा, नैसर्गिक साधन संपत्तीचा स्विकार करावा. आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य आणि देश सुदृढ व्हावा यासाठी मराठी भाषेचा अभ्यास करावा, व पवित्र मराठी भाषेला दर्जा मिळावा, पवित्र अशा गोमातेचे संगोपन करुन आपल्या संस्कृतीचे, आरोग्याची जपणूक करुन मानवसेवा करुन देशाची शान वाढवावी. गो-मातेच्या गो-मूत्रापासून औषध निर्मिती करावी व मल-मूत्रापासून सेंद्रिय शेती करावी. यासाठी प्रत्येकानं मराठी भाषेची प्राचीन संस्कृतीची कास धरावी यासाठी प्रत्येकानं मराठी भाषा यावी यासाठी मराठी भाषेस अभिजात दर्जा मिळावा यासाठी नेहमी प्रयत्नशील रहावे.

दळवी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर, विनोद गोरे, भगवंत चितळकर, मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजेश गायकवाड, नारायण पवार, दत्तात्रय जाधव, माजी मुख्याध्यापक काशीनाथ निंबळे, दशरथ ढमढेरे, मावळ तालुका शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष संजय कसाबी, मधुकर गुरव, संदिप खुडे, बाजीराव भोईरकर, सुर्यकांत भोईरकर, संदिप देवरे, अश्विन नायडू यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *