Pimpri News : … तर महापालिका भवनावर चढून आंदोलन करू
Pckhabar- पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व खाजगी आणि सरकारी जागेवरील जीआयएस पध्दतीने वृक्षगणना करणार्या में.टेरेकोन इकोटेक प्रा .लि या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे. ठेकेदाराकडून 3 लाख 50 हजार रुपये दंड वसूल करण्यात यावा. ठेकेदारास पाठिशी घालणार्या अधिकार्यांची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. ड प्रभागातील ज्यु इंजिनिअर वर्षा कदम यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा किंवा त्यांना 50 हजार दंड ठोठावण्यात यावा, अशा विविध मागण्यासाठी रयत विद्यार्थी परिषदेने महापालिका भवनावर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत रयत विद्यार्थी परिषदेचे सचिव रविराज काळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिका क्षेत्रातील सर्व खाजगी आणि सरकारी जागेवरील जीयाएस पद्धतीने वृक्ष गणनेचे कामकाज 2018 साली सुरू करण्यात आले.2 वर्ष वृक्षगणनेचे कामकाज पूर्ण करून 3 वर्षे देखभाल असे 5 वर्षाचे कामकाजाचे स्वरूप होते. परंतु में.टेरेकोन इकोटेक प्रा.लि. या संस्थेने वृक्ष गणनेच्या कामकाजात निष्काळजीपणा दाखवून खुप मोठ्या प्रमाणावर पालिकेचा पैसा आणि वेळ वाया घालविला आहे. तीन वेळा लाखो रुपये दंड ठोठावूनही आणि एक वेळा मुदतवाढ देऊनही दिलेल्या मुदतीत. वृक्षगणनेचे कामकाज पूर्ण न झाल्यामुळे सदर ठेकेदारास कामकाजातील विनाकारण विलंब, अनियमितता यामुळे. वृक्ष गणनेचे कामकाज पूर्ण होण्यास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे.
में.टेरेकोन इकोटेक प्रा .लि या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे. ठेकेदाराकडून 3 लाख 50 हजार रुपये दंड वसूल करण्यात यावा. ठेकेदारास पाठिशी घालणार्या अधिकार्यांची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. ड प्रभागातील ज्यु इंजिनिअर वर्षा कदम यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा किंवा त्यांना 50 हजार दंड ठोठावण्यात यावा. आमच्या मागण्या संदर्भात आपण कोणतीही कारवाई न केल्यास 6 ऑक्टोंबर रोजी महापालिका भवनावर चढून आंदोलन करण्याचा इशारा काळे यांनी दिला आहे.










Leave a Reply