Chikhali Political News : निवडणुकीतील प्रतिस्पर्ध्यांला धडकी भरविणारे कार्य करा   : रवींद्र मिर्लेकर

Chikhali Political News : निवडणुकीतील प्रतिस्पर्ध्यांला धडकी भरविणारे कार्य करा   : रवींद्र मिर्लेकर
Pckhabar-   निवडणूक फक्त लढू नका तर ती जिंकण्यासाठी लढा. मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक  मतदारांपर्यंत पोहोचा. आपले मतदार कोणते हेही शोधा, सामाजिक काम कराच पण त्यामाध्यमातून किती लोक जोडले गेले याचाही अभ्यास करा. निवडणुकीतील  प्रतिस्पर्ध्याला धडकी भरेल असे कार्य करा, असा कानमंत्र शिवसेना उपनेते रवींद्र  मिर्लेकर यांनी  दिला.

चिखली-मोरे वस्ती येथे शिवसेना उपशहरप्रमुख  नेताजी काशीद यांनी आयोजित केलेल्या सेवा सप्ताहाचा समारोप  मिर्लेकर यांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभाने झाला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना शहरप्रमुख  ऍड. सचिन  भोसले, महिला आघाडी संघटिका सुलभा उबाळे, माजी शहरप्रमुख  योगेश बाबर, महाराष्ट्र वितरक सेनेचे  जिल्हाध्यक्ष रावसाहेब थोरात यांच्यासह  अनिल सोमवंशी, अशोक खांडेभराड,  युवराज कोकाटे, साधना काशीद, शैलेश मोरे, संजय गाढवे  आदी उपस्थित होते.

संजय गाढवे,  दादाराव ठाकरे, सुमन तांबे, शिवाजी कापसे,  गणेश अवचित, आबा कवितके,  दत्ता मोरे, रमेश सांगळे, सूर्यकांत देशमुख यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

जेष्ठांच्या आशिर्वादातून निवडणुकीत चमत्कार घडेल

नेताजी काशीद यांनी सेवा सप्ताहाच्या माध्यमातून  समाजातील सर्व घटकांसाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून   सामाजिक कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असेच आहे. जेष्ठ नागरिकांच्या सत्कारातून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे निवडणुकीत काशीद यांना जेष्ठांचा आशीर्वाद मिळेल, असा विश्वासही मिर्लेकर यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *