Pimpri News : राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत ऋग्वेदा डोळसचे यश
Pckhabar-मुंबई येथे महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र एअर फायर आर्मस राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत पिंपळे गुरव येथील पँथर रिपब्लिकन पार्टी (एस)चे संस्थापक अध्यक्ष गौतम डोळस यांची नात नेमबाज ऋग्वेदा रघुनाथ डोळस हिने २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल इव्हेंट सिनियर वूमेन गटात २४७ गुण प्राप्त करुन द्वितीय क्रमांक पटकावला.
या कामगिरी बरोबरच तिची ऑक्टोबर महिन्यात अहमदाबादमध्ये होणाऱ्या पूर्व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत मुंबई येथील नेमबाज नमिता पाटीलने २६२ गुण प्राप्त करीत प्रथम क्रमांक पटकावला.
पिंपळे गुरव येथील ऋग्वेदा रघुनाथ डोळस या श्री शिछत्रपती क्रीडासंकुल बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय नेमबाज सोनाली परेराव, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुंदर घाटे यांच्या अंतर्गत प्रशिक्षण घेत आहेत. त्याचमाणे या वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत १० मीटर इवेनमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. ऋग्वेदा डोळस हिचे कुटुंब, मित्र परिवार, परिसरातील नागरिकांकडून मिळविलेल्या यशाबद्दल अभिनंदन व कौतुक होत आहे. तसेच आगामी स्पर्धेसाठी तिला गौतम डोळस यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.










Leave a Reply