IPL News : मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव; प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग खडतर

IPL News : मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव; प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग खडतर

Pckhabar-आयपीएल 2021 च्या स्पर्धेत मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील तीन सामन्यात सलग पराभवाचे तोंड पाहावं लागल्याने सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे. तर कालच्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबईवर 54 धावांनी मात करत विजय मिळवला.

मुंबई इंडियन्सने (mi) चांगली पकड मिळवली असतानाच हर्षल पटेलने (harshal patel) हॅट्रटिक साधून नवा रेकॉर्ड केला आहे. मुंबईविरुद्ध त्याने 4 विकेट्स मिळवल्या.

मुंबईत इंडियन्सची टीम 111 धावांवर बाद झाली आहे. रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. रोहितने सर्वाधिक 43 रन्स केले. तर क्विंटन डी कॉक 24 रन्स केले आहे.

विशेष म्हणजे, रोहित आणि क्वि्टनने दमदार सुरुवात केली होती. पण, क्विटन 23 रन्स करून आऊट झाला. त्यावेळी स्कोअर हा 57 इतका होता. त्यानंतर 72 धावांवर रोहित शर्माही 43 रन्स करून आऊट झाला.

सलामीची जोडी माघारी परतल्यामुळे ईशान किशन, सुर्यकुमार यादव, पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्यावर जबाबदारी येऊन पडली होती. पण, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल आणि युजवेंद्र चहलने मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगची पुरती वाट लावून टाकली.

चहलने ईशान किसनला ९ रन्सवर माघारी पाठवले त मोहम्मद सिराजने सुर्यप्रसादला ८ रन्सवर आऊट केलं. त्यानंतर मुंबईत इंडियन्स डाव पत्ताच्या बंगल्या प्रमाणे कोसळला.

एक एक खेळाडू मैदानाचे दर्शन करून लगेच माघारी परतला. हर्षल पटेलने एकाच ओव्हरमध्ये पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि राहुल चहरला आऊट करून हॅट्रटिक साधली. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा खेळ खल्लास झाला. अवघा संघ 111 धावांवर गारद झाला.

त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीने मुंबईसमोर 166 धावांचे लक्ष्य ठेवले. सलग दुसऱ्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीनं शानदार अर्धशतक झळकावलं, त्यानं 42 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 51 धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाज ग्लेन मॅक्सवेलनेही उत्कृष्ठ फलंदाजी करत 37 चेंडूत 56 धावा चोपल्या. यामध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 गडी बाद केले. त्यानं शेवटच्या षटकांमध्ये आरसीबीला जास्त धावा काढण्यापासून रोखून धरले. त्याच्याशिवाय बोल्ट, चाहर आणि अॅडम मिलने यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *