Pimpri News : बदलत्या काळानुसार अभियंत्याने स्वतःला “अपडेट” ठेवले पाहिजेत : बनसोड

Pimpri News : बदलत्या काळानुसार अभियंत्याने स्वतःला “अपडेट” ठेवले पाहिजेत : बनसोड
Pckhabar-” बदलत्या काळानुसार आणि कंपन्यांच्या गरजेप्रमाणे अभियंत्याने स्वतःला अपडेट ठेवले पाहिजेत. ” असे मत एमर्सन इंडियाचे संचालक अभय बनसोड यांनी व्यक्त केले.

आकुर्डी स्थित डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इन्स्ट्रुमेंटेशन व कंट्रोल शाखेमध्ये इमर्सन इंडियाने सुरू केलेल्या सेंटर ऑफ एक्सेलंस च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इन्स्ट्रुमेंटेशन व कंट्रोल शाखा आणि इमरसन इंडिया यांच्यात सामंजस्य करार झाला.

इमरसन इंडियाने हे सेंटर विकसित करण्यासाठी 22 लाख खर्च केले आहे. या अंतर्गत “डेल्टा व्ही” या डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल प्रणालीचा संपूर्ण सेटअप देणगी च्या स्वरूपात दिला आहे.

डीवायपाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. नीरज व्यवहारे म्हणाले की, विद्यार्थी विकासासाठी व्यवस्थापन नेहमी पाठिंबा देत राहील. डिपार्टमेंट ने काळाची पावले ओळखून हा जो नवीन ज्ञानाचा मार्ग विद्यार्थ्यांसाठी खुला करून दिला, हि कौतुकास्पद बाब आहे.
कॉलेजचे प्राचार्य डॉ विजय एम. वढाई म्हणाले कि, य डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टिम चे जे प्रशिक्षण विद्यार्थ्याना मिळेल यामुळे संशोधन क्षेत्रातील वाढणाऱ्या संधीचा लाभ घेता येईल. विद्यार्थ्यांना रिसर्च व इनोव्हेशन मधील नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध होतील.

इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंट चे शाखाप्रमुख डॉ बी.बी. मुसमाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

ऑनलाइन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आयोजित कार्यक्रमास सुमारे दीडशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी देशपांडे, विनिता एरंडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विपीन विभूते आणि नितीन माने, रचना संगितराव, आरती उटीकर आणि अर्चना केस्ती, नीलिमा सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रम राबविण्यासाठी डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल आकुर्डी चे संचालक डॉ. नीरज व्यवहारे, डी. वाय. पाटील प्रतिष्ठान चे विश्वस्त तेजस पाटील, तसेच प्रतिष्ठानचे चेअरमन तथा गृहराज्यमंत्री सतेज डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *