IPL News : पंजाबचे बल्लेबल्ले ;
अटीतटीच्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादवर पाच धावांनी विजय
Pckhabar- आयपीएलच्या ३७व्या मॅचमध्ये अटीतटीच्या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा पाच धावांनी पराभव केला.
हैदराबादने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पंजाबने वीस ओव्हरमध्ये सात बाद १२५ धावा केल्या तर हैदराबादने वीस ओव्हरमध्ये सात बाद १२० धावा केल्या. तीन विकेट आणि नाबाद ४७ धावांचे योगदान देणारा हैदराबादचा जेसन होल्डर मॅन ऑफ द मॅच झाला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबकडून कॅप्टन केएल राहुलने २१ धावा केल्या. मयंक अग्रवालने पाच, ख्रिस गेलने १४, एडेन मार्करामने २७, निकोलस पूरनने आठ, दीपक हूडाने १३, हरप्रीत ब्रारने नाबाद १८, नॅथन एलिसने १२, मोहम्मद शमीने नाबाद शून्य धावा केल्या. हैदराबादच्या जेसन होल्डरने चार ओव्हरमध्ये १९ धावा देत तीन विकेट घेतल्या. राशिद खान, संदीप शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि अब्दुल समद या चौघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
नंतर फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नरने दोन, वृद्धिमान साहाने (धावचीत) ३१, कॅप्टन केन विल्यमसनने एक, मनिष पांड्येने १३, केदार जाधवने १२, अब्दुल समदने एक, जेसन होल्डरने नाबाद ४७, राशिद खानने ३ आणि भुवनेश्वर कुमारने नाबाद ३ धावा केल्या. पंजाबकडून रवी बिश्नोईने चार ओव्हरमध्ये २४ धावा देत तीन विकेट घेतल्या. मोहम्मद शमीने दोन तर अर्शदीप सिंहने एक विकेट घेतली.










Leave a Reply