Corona News :  शहरातील कोरोना रूग्ण संख्या हजारच्या आत

Corona News :  शहरातील कोरोना रूग्ण संख्या हजारच्या आत
Pckhabar-  पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या दिवसेंदिवस घटत असून रूग्ण संख्या हजारच्या आत आली आहे. त्यामुळे शहरवासियांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.  शहरात 124 नवीन रूग्ण सापडले आहेत. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 247  जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 3 रुग्णांचा मृत्यू झाला.

शहरातील 2 लाख 73 हजार 328 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 970 सक्रीय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 603  रुग्ण गृहविलगीकरणात असून 367 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

शनिवारी 596 घरांना भेटी देऊन 1 हजार 943 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. आजपर्यंत 18 लाख 56 हजार 965 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *