IPL News : आरसीबीची हाराकिरी सुरूच; चेन्नई सुपरकिंग्सने 6 विकेट्सने केली मात
Pckhabar- विराट कोहलीचा (Virat Kohli) संघ रॉयल चँलेजर्स बंगळुरुला (RCB) महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने (CSK) 6 विकेट्सनी मात देत विजय मिळवला आहे. आरसीबीचा सलग दुसरा पराभव आहे.
चेन्नईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी घेतल्याने आरसीबीने प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांनी सुरुवातीपासूनच फटेबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी आधी देवदत्तने आणि नंतर विराटने अर्धशतकाची नोंद केली. देवदत्तने 50 चेंडूत 70 धावा केल्या ज्यामध्ये त्याने 5 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर दुसरीकडे विराटने देखील दमदार अर्धशतक लगावलं. त्याने 41 चेंडूत 53 धावा केल्या. या खेळीत विराटने 6 चौकार आणि एक षटकार ठोकला. पण त्या दोघानंतर एकाही खेळाडूला खास फलंदाजी करता आली नाही. डिव्हीलीयर्सने 12 आणि मॅक्सवेलने 11 धावा केल्या तर बाकी खेळाडूंना दुहेरी संख्याही गाठता न आल्याने आऱसीबी केवळ 157 धावाचं करु शकले.
चेन्नईला विजयासाठी 157 धावांचे आव्हान मिळाले असतानाच चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड (38) आणि फाफ डुप्लेसी (31) यांनी चांगली सुरुवात करुन दिली. मध्यल्या फळीत मोईन अली (23) आणि अंबाती रायडू (32) यांनी विजयाच्या जवळ संघाला नेऊन ठेवले. पण दोघेही बाद होताच आरसीबी कमबॅक करेल असे वाटत होते. त्याच क्षणी फिनिशर जोडी महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे नाबाद 11 आणि नाबाद 17 धावा करत संघाला सहा गडी राखून विजय मिळवून दिला.










Leave a Reply