Pimpri News : एचएसबीसी आणि विप्ला फाउंडेशनच्या वतीने 450 गरजूंना किराणा वाटप

ही बातमी शेअर करा.

 

Pimpri News : एचएसबीसी आणि विप्ला फाउंडेशनच्या वतीने 450 गरजूंना किराणा वाटप

Pckhabar- पिंपरी-विप्ला फाउंडेशनच्या वेव्ह ऑफ होप(WAVE OF HOPE) या कार्यक्रमांतर्गत पिंपरी येथे गोर-गरीब 450 लोकांना किराणा वितरित करण्यात आला.

गरीब,निराधार,विधवा,परित्यक्ता हे समाजातील दुर्बल घटक आहेत, कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेचे चक्र मंदावले आहे. समाजातील दुर्बल घटकांचे उत्पन्न कमी झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती त्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. अशा लोकांच्या घरातील चूल बंद राहु नये, या मानवतावादी दृष्टीकोनातून त्यांना आम्ही मदत करत आहोत.
असे गिरीश बिदानी यांनी सांगितले.

विप्ला फौंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी(CEO)श्रीमती हवोवी वाडीया म्हणाल्या की, महामारीचा काळ अतिशय बिकट आहे,हे संकट लवकर दूर होईल. गोर गरीब जनतेला किमान समृद्ध करण्यासाठी सेवाभावनेतून आपण सर्वांनी उपेक्षितांच्या भुकेचा प्रश्न सोडवू. हे आपले ईश्वरी कार्य आहे.कठीण काळात उपेक्षिता ना दिलासा दिला पाहिजे,हे सर्वांचे कर्तव्य आहे.

शहरातील,अंध,अपंग,मूकबधिर,घरेलू महिला कामगार आणि स्किल डेव्हलपमेंट (SKILL DEVELOPMENT)च्या विद्यर्थिनीना दोन महिने पुरेल इतके किराणा किटचे वितरण करण्यात आले.

विप्ला फाउंडेशन, एच एस बी सी(HSBC) यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील हॉटेल अल्पाईन यांच्या सौजन्याने शहरातील 450 गरजूना किराणा वितरित करण्यात आला.

एच एस बी सी(HSBC)च्या जैद कापडी दामिनी खैरे, फाउंडेशनचे प्रमुख पदाधिकारी प्रवीण जाधव,विनोद भालेराव सह गायत्री दीक्षित, विश्वनाथ बी व्ही, यांच्या हस्ते किराणा वितरित करण्यात आला. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे संयोजन प्रा.दिपक जाधव, प्रा.वैशाली गायकवाड यांनी केले.


ही बातमी शेअर करा.