Sangvi Crime News : अण्णा, माझ्या मुलीच्या डोक्यावरून ट्रक गेल्याय, उपचारासाठी पैसे पाहिजेत असे म्हणून भाजप नगरसेवकाची फसवणूक

Sangvi Crime News : अण्णा, माझ्या मुलीच्या डोक्यावरून ट्रक गेल्याय, उपचारासाठी पैसे पाहिजेत असे म्हणून भाजप नगरसेवकाची फसवणूक
Pckhabar-अण्णा, माझ्या मुलीच्या डोक्यावरून ट्रक गेल्याय, उपचारासाठी पैसे पाहिजेत असे म्हणून पिंपळे गुरव भागातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांची एकाने साडेसहा हजार रुपयांची फसवणूक केली. अशाच प्रकारे सांगवी आणि पिंपळे गुरव भागातील 2 ते 3 नगरसेवकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भाजपचे नगरसेवक अंबरनाथ चंद्रकांत कांबळे (वय-49, रा. विनायक नगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार
८३२९७७३२०४ व ७२१८१७५५३९ या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे हे भाजपचे नगरसेवक आहेत. त्यांना अण्णा या टोपण नावाने ओळखले जाते. कांबळे यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आरोपीने ८३२९७७३२०४ व ७२१८१७५५३९ यावरुन फोन केला. अण्णा, माझ्या मुलीच्या डोक्यावरून ट्रक गेला असुन तिला उपचारासाठी वाय.सी.एम. हॉस्पीटल याठिकाणी अॅडमीट केले आहे. उपचारासाठी पैसांची गरज आहे असे सांगितले. यावर कांबळे यांनी आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवुन फिर्यादी हे कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांनी त्यांच्या पत्नीला पैसे देण्यासाठी सांगितले. त्यांच्या पत्नीने त्यांचा मोबाईल नंबर वरुन गुगल पे चे मार्फतीने यातील आरोपी याचा मो नंबर ८३२९७७३२०४ व ७२१८१७५५३९ यावर ६,५०० रुपये गुगल पे मार्फत पाठविले. त्यानंतरही आरोपीने कांबळे यांच्याकडे १० हजार रुपयांची मागणी केली. कांबळे यांना संशय आल्याने त्यांनी वाय.सी.एम. हॉस्पीटलमध्ये वैदयकीय अधिकारी यांच्याकडे रूग्ण भाग्यश्री बावीस्कर हीचे बाबत चौकशी केली. मात्र, या नावाचा पेशंट उपचारासाठी अॅडमीट नसल्याचे समजले. त्यामुळे नगरसेवक कांबळे यांनी पोलीसात तक्रार दिली.

अशाच प्रकारे पिंपळे गुरव आणि सांगवी भागातील 2 ते 3 नगरसेवकांची फसवणूक झाल्याचे पोलीस निरीक्षक टोणपे यांनी सांगितले. मात्र , संबंधित नगरसेवकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *