Chinchwad News : वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य संभाजी बारणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Pckhabar- वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य थेरगाव येथील संभाजी बारणे यांनी आज (शुक्रवार) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला. पुण्यात झालेल्या या पक्ष प्रवेशाच्या वेळी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक विनोद नढे, नगरसेवक कैलास बारणे, उद्योजक अभय मांढरे, संतोष बारणे आदी उपस्थित होते.
भाजप संलग्न अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांचे पती संतोष बारणे, मराठवाडा जन विकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार यापूर्वीच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर आता संभाजी बारणे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे शहर भाजपला मोठा धक्का बसला आहे.










Leave a Reply